शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: येरवडा कारागृहात गुंडांच्या टोळ्यांमध्ये राडा; तब्बल १६ कैद्यांवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: June 20, 2023 11:04 IST

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १६ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे....

पुणे : क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट संख्येने एकेका बरॅकीत भरलेल्या कैद्यांमुळे त्यांच्यात परस्परात वाद, मारामार्‍या सातत्याने सुरु असतात. येरवडा कारागृहात अशाच एका बरॅकमधील कैद्यांमध्ये वर्चस्ववादातून जोरदार हाणामारी झाली. त्यात त्यांनी एकमेकांवर दगड, पत्र्याचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. रावण गँग, चिखली, वारजे रामनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या टोळ्यांमधील हे कैदी आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १६ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश शांताराम येवले, विजय चंद्रकांत विरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनिल साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनुराग परशुराम कांबळे, मेहबुब फरिद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

ही हाणामारी येरवडा कारगाृहातील सर्कल ३ परिसरातील बरॅक ८ मध्ये सोमवारी सकाळी १० ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत तुरुंगाधिकारी हेमंत गोविंदराव इंगोले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या  २ हजार ५२६ इतकी आहे. त्या ठिकाणी सध्या ६ हजार ४८४ कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एकेका बरॅकीत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत. त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून अंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.

हे वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार आहेत. सोमवारी सकाळी अशाच छोट्या मोठ्या वादाचे मोठ्या हाणामारीत रुपांतर झाले. या कैद्यांनी एकमेकांना तेथील दगड, पत्र्यांचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहताच तुरुंगातील रक्षकांनी त्यांना बाजूला घेऊन हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कैदी किरकोळ जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडyerwada jailयेरवडा जेल