शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मॅडी ‘एफटीआयआय’चा नवा हिरो; कॅज्युअल लुकमध्ये जोरदार एंट्री

By नम्रता फडणीस | Published: October 04, 2023 10:11 PM

चेअरमन झाल्यानंतर पहिल्यांदाच आर. माधवन कॅम्पसमध्ये : अनेकांनी काढले फोटो, हस्तांदोलनही

नम्रता फडणीस, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : जीन्स, काळा टी शर्ट अन् डोक्यावर नेव्ही ब्लू कॅप अशा पेहरावात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे नवनिर्वाचित चेअरमन आर. माधवन यांनी बुधवारी संस्थेमध्ये एंट्री करीत पदभार स्वीकारला. चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांनी एफटीआयआयला पहिल्यांदा भेट देत संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. गुरुवारी (दि. ५) ते पुण्यात मुक्कामी असून, सकाळी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनशी संवाद साधणार आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांनी संस्थेत प्रवेश केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपणहून त्यांच्याशी हस्तांदोलन केले, तर काहींनी मोबाइलमध्ये त्यांचे फोटो घेतले.

आर. माधवन हे नाव समोर आले की प्रत्येकालाच 'आरएचटीडीएम' (रहेना है तेरे दिल में) मधील 'मॅडी'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बुधवारी कलेच्या प्रांगणात माधवन यांनी कॅज्युअल लूकमध्येच प्रवेश केला. यापूर्वीचे चेअरमन दिग्दर्शक शेखर कपूर यांची लॉकडाऊन काळातच नियुक्ती झाल्याने त्यांना संस्थेमध्ये येण्याची फारशी संधी मिळाली नाही; पण आर. माधवन यांची दि. १ सप्टेंबर रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती केली. त्यानंतर महिन्याभरातच त्यांनी संस्थेला पहिल्यांदा भेट दिली. संस्थेमध्ये कोणकोणते विभाग आहेत?, त्याचे कामकाज कसे चालते? याची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच काही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाददेखील साधला. संस्थेमध्ये त्यांच्याकॅज्युअल लूकमुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या.

'मॅडी"च्या उपस्थितीने महिला काॅन्स्टेबलही भारावली

जगभरात आर. माधवन यांचे चाहते आहेत. यात एफटीआयआयमध्ये बंदोबस्तासाठी लावलेल्या महिला काॅन्स्टेबलही अपवाद ठरल्या नाहीत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहून त्याही भारावल्या. माधवन यांच्याशी महिला काॅन्स्टेबलची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी माधवन यांच्याबरोबर फोटो काढला. फोटो काढल्यानंतर त्या महिला काॅन्स्टेबलच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

 

टॅग्स :FTIIएफटीआयआयR.Madhavanआर.माधवन