शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विद्यावेतनाचा प्रश्न तापला, संघटनांकडून दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:59 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. मात्र, निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात पार पडली. कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. मात्र, शुक्रवारी भेट होऊ शकली नाही. येत्या दोन दिवसांत विद्यावेतन बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला. अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन देण्यात आले आहे. विद्यावेतनाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासन म्हणते. मात्र, सदस्य कोण आहेत? किती दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. समिती गोपनीय असल्याचे उत्तर दिले जात आहे.विद्यावेतन देण्याबाबत सकारात्मकविद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला? जर विद्यावेतन देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, तर ते बंद का करण्यात आले? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ