शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 01:36 IST

मुंबई दूरदर्शनने कॉपीराईटच्या मुद्द्यावरून नोंदविला आक्षेप

नम्रता फडणीस

पुणे : मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कार्यक्रमांवर मुंबई दूरदर्शनचा हक्क असल्याने सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमांचे परवानगीविना सादरीकरण करता येणार नाही, असा आक्षेप मुंबई दूरदर्शनकडून नोंदविण्यात आला आहे.

तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांना मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रमांद्वारे सादर करताना अरुण काकतकर यांनी काहींचे खाजगी रेकॉर्डिंग करून ते जतन केले. या संग्रहात हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणीतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींचे मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबीयांची संवाद आणि गाण्यांची मैफल, राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने अशा नानाविध दुर्मिळ गोष्टींचा समावेश आहे.

चित्रफिती आणि श्राव्यफितीचा हा अमूल्य ठेवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त करून टप्प्याटप्प्याने या ठेव्याचे दर्शन रसिकांना घडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. या सुंदरमालिकेतील ‘शांकुतल ते मानापमान’ हा कार्यक्रम येत्या १ सप्टेंबरला फगर््युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये सादर होणार होता. मात्र मुंबई दूरदर्शनचे सहायक संचालक एम. एस. थॉमस यांनी कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित करीत या खासगी ठेव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यासंदर्भात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मेल पाठवल्याने हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. मात्र स्वसंग्रही असलेले हे कार्यक्रम दूरदर्शनकडेदेखील नाहीत, असा युक्तिवाद काकतकर यांनी केला आहे. मुंबई दूरदर्शननेच नाटककार सुरेश खरे यांच्याकडे ‘शांकुतल ते मानापमान’ची कॉपी आहे का? अशी विचारणा केली होती.

आपले मूळ स्रोतच त्यांच्याकडे नाहीत, यासारखे दुर्दैव नाही. त्यांच्या संग्रही असलेल्या बऱ्याचशा टेप्स या नष्ट झाल्या आहेत. दूरदर्शनकडे हा ठेवा असेल तर त्यांनी तो दाखवावा. गेल्या तीस ते चाळीस वर्षांत त्यांनी तो का दाखवला नाही? असा सवालही त्यांनी केला. या कार्यक्रमांचे जाहीर सादरीकरण करून पैसे कमावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दूरदर्शनचे कार्यक्रम शासनाची प्रॉपर्टीदूरदर्शनचे कार्यक्रम ही शासनाची प्रॉपर्टी आहे, त्यावर मुंबई दूरदर्शनचा कॉपीराईट आहे. कलाकारांना दूरदर्शनच्या खर्चाने बोलावले जाते, त्यामुळे त्या कार्यक्रमांवर दूरदर्शनचाच अधिकार आहे. कार्यक्रमांचे खासगी रेकॉर्डिंग करून ते स्वसंग्रही ठेवले जाऊ शकते. मात्र सार्वजनिक ठिकाणी दूरदर्शनची परवानगी न घेता त्याचे सादरीकरण करणे हा कॉपीराईटचा भंग आहे.- एम. एस. थॉमस, सहायक संचालक,व्यवसाय व महसूल विभाग, मुंबई दूरदर्शन 

टॅग्स :Puneपुणे