शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न विचारले की राष्ट्रद्रोही समजले जाते : मुक्ता मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:16 IST

पुणे सार्वजनिक सभेचा यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

पुणे : ‘‘आपला देश सूर्य प्रकाशाने समृद्ध असूनही आपण सौरऊर्जेचा वापर न करता सूर्याची पूजा केली पाहिजे असे मानतो. प्रश्नविचारले किंवा हातात घेतले की, राष्ट्रद्रोही समजले जाते. वास्तव आणि सत्य परखडपणे स्वीकारण्याची वेळ आली असून, आपल्या समाजातील हा अशिक्षितपणा मोडण्याची आता गरज आहे,’’ असे मत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केले.

कै. ग. वा. जोशी तथा सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा ही संस्था यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०)वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोहर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सभेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कोशाध्यक  सुरेश कालेकर, भारत साबळे, शरद गर्भे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ३ हजार १ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. संस्थेच्या ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

विद्याधरपंत नारगोलकर म्हणाले, पुणे सार्वजनिक सभेच्या यंदाच्या १५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रा. के. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरविंद नवरे यांनी आभार मानले. या वेळी पुरस्कारार्थिंनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारामुळे बळ मिळते, अशी भावना व्यक्त केली.अंतर्गत यंत्रणा स्वच्छ झाली तर भारत स्वच्छ१ मुक्ता मनोहर म्हणाल्या, एकीकडे तंत्रज्ञान पुढारत आहे आणि दुसरीकडे बारा ते पंधरा फूट गटारात उतरून आजही कामगार स्वच्छता करीत आहेत. या व्यवसायावर आजही जुन्या विचारांचा पगडा कायम दिसतो. स्वच्छतेची अंतर्गत यंत्रणा कशी स्वच्छ ठेवता येईल, याचा विचार प्रत्येक जण करेल तेव्हा भारत स्वच्छ होत आहे, असे म्हणता येईल.२ स्त्रीला एक स्वतंत्र अस्मिता आहे तिला स्वतंत्र ओळख आहे हे आपण कधी ओळखणार आहोत, असा प्रश्न रेणू गावस्कर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, व्यक्तीला समाजातील स्थानावरून नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वावरून ओळखायला शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांनाही शिकविले पाहिजे. टाळ््या वाजविणारे हात जेव्हा समाजिक जबाबदारीचे काम करायला लागतील तेव्हा बदल घडेल.

टॅग्स :Puneपुणे