शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार सुरक्षेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:15 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत.

ठळक मुद्देअभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गावांची पाहणी करून यामधून २३ गावांची करण्यात आली निवड पावसाळ्यापूर्वी पीडब्ल्यूडी ही कामे पूर्ण करणार

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टळणार आहे. माळीणमध्ये झालेल्या दुर्घटनेत १५१ ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते. या गावामध्ये पुनर्वसनाचे काम झाल्यानंतर, नव्याने गाव उभे करण्यात आले. या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील अशा स्वरूपाच्या संवेदनशील गावांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे धोरण आखण्यात आले होते. त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गावांची पाहणी करून यामधून २३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या विकासकामांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बैठक घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकासकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाने यातील काही गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. यासोबतच काही गावांमध्ये दीर्घकालीन उपाययोजना करण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून निधीअभावी ही कामे रखडल्याने विलंब लागत होता. निधी मंजूर झाल्याने अत्यावश्यक कामांना सुरुवात केली जाणार असून पावसाळ्यापूर्वी पीडब्ल्यूडी ही कामे पूर्ण करणार आहे. या गावांमध्ये तात्पुरत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत. 

तालुकागावे
मुळशी     घुटके
मावळ         भुशी, मालेवाडी, सावळे, माऊ, लोहगड, ताजे, बोरज, तुंग
भोरधानवली, कोले (जांभवली), डेहणे, पांगरी (सोनारवाडी)
टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागPuneपुणे