शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुरुषोत्तम करंडक : नऊ संघ अंतिम फेरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:17 IST

मातबर संघाचाच समावेश : ‘पुरुषोत्तम’चा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

पुणे : ‘अरे आवाज कुणाचा’च्या जल्लोषात सुरू असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून, अंतिम फेरीमध्ये नऊ संघ दाखल झाले आहेत. यामध्ये पुरुषोत्तम करंडकवर वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या मातबर संघाचाच अधिकांश समावेश आहे.

महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी महाविद्यालयांची चढाओढ लागल्याचे पाहायला मिळते. भरत नाट्य मंदिर येथे पंधरा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये एकूण ५१ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ९ संघांची वर्णी लागली. त्यामध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालय (व्हिक्टिम), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय (अफसाना), पी.ई.एस मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉर्नर), पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (पी.सी.ओ.), गरवारे वाणिज्य महाविद्यालय (टी.एल.ओ), मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (रसिक), फगर््युसन महाविद्यालय (विपाशा), स. प. महाविद्यालय (बातमी क्रमांक एक करोड एक) आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय ( दोन पंथी) या संघांचा समावेश आहे.स्पर्धेचे परीक्षक म्हणून मानसी मागीकर, विनय कुलकर्णी आणि संजय पेंडसे यांनी काम पाहिले. स्पर्धेची अंतिम फेरी १ आणि २ सप्टेंबर रोजी होणार असून, दरवर्षीप्रमाणे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी त्या त्या फेरीतील निकाल जाहीर होतील.स्पर्धेतील अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिकेसाईप्रसाद रेडकर (एम फॉर सिंपथी- जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय), संयुक्ता कुलकर्णी (१२ किमी- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ), कुणाल राशिंगकर ( कॉफीन-डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), उत्कर्ष खौदले (भिंत-भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय), जय ऐडळेवर ( प्रयोग १० वा-शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), ॠत्विक रास्ते ( मरीआईचा गाडा- टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य महाविद्यालय), प्रियांका भालेराव ( बेस्ट आॅन अ स्टोरी- सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव बुद्रुक)

टॅग्स :Puneपुणे