शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

दिवसात ५४ लाखांच्या फ्रेमची खरेदी

By admin | Updated: May 25, 2015 23:05 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटोफ्रेमचा सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी पंचनामा केला.

पुणे : सर्वशिक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटोफ्रेमचा सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी पंचनामा केला. ५४ लाखांच्या या फ्रेम खरेदी केल्याचा थांगपत्ता खुद्द शिक्षण मंडळाच्या सभापतींनाही नव्हता. याचा जाब सदस्यांनी आज संबंधित अधिकाऱ्याला विचारला. फोटो खरेदीची माहिती मिळविण्यासाठी सभेत गदारोळ झाला. संतप्त सदस्यांनी खुर्च्या उचलून फेकल्या, तेव्हा खरी माहिती बाहेर आली. यानंतर उपशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांचा पदभार तात्काळ काढून घेण्यात आला.या संदर्भात अधिक माहिती अशी, की ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वशिक्षा अभियानांतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निवडक फोटोफ्रेम लावण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकाऱ्यांनग पत्र आले. सन २0१४-१५मध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना या लेखा शीर्षकाखाली, पाठ्यपुस्तके, स्वाध्यायपुस्तिका खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या तरतुदीच्या आधीन राहून, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये १0 फोटोंपैकी ५ फोटोफ्रेमचा संच शाळांत सुस्थितीत उपलब्ध असलेल्या फोटोंव्यतिरिक्त निवड करून राज्यातील १८ हजार शाळांकरिता खरेदी करावयाचे आहेत. सदर संचाची खरेदी जिल्हास्तरावरून करून या बाबतची अदागी जिल्हा स्तरावरूनच करावयाची आहे. तसेच हा संच आपल्या स्तरावरून भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ यांच्याकडून घ्यावा, असे निर्देश दिले होते. या खरेदीची माहिती गेली दोन महिने उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती शुक्राचार्य वांजळे हे मागत होते. मात्र त्यांनाही ही माहिती देण्यात आली नाही. आज शिक्षण समितीची बैठक होती. ती सुरु होण्याआधीच शिवसेना सदस्या कुलदीप कोंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी २५ लाख रुपयांची खरेदी असल्याचे सांगितले. तेव्हा प्रताप पाटील, शांताराम सोनवणे, श्रीमंत ढोले यांनी अधिकारी खोटी माहिती देत आहेत. प्रत्यक्ष फाईल आणा, अशी मागणी झाली. अधिकारी नीट उत्तर देत नसल्याने सदस्य संतप्त झाले. त्यांनी खुर्च्या उचलून फेकल्या आणि सभागृहातून बाहेर पडले. ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले. तेथे हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सदस्यांना विनंती करून सभागृहात आणले. हा सगळा गदारोळ झाल्यानंतर खरी माहिती समोर आले. ही खरेदी ५४ लाखांची असल्याचे उघड झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी महाजन यांचा पदभार काढून घेतला. शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी महाजन यांची खाते निहाय चौकशीची, फोटो खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)कोणाचे फोटोछत्रपती शिवाजीमहाराजराजमाता जिजाऊछत्रपती शाहूमहाराजसावित्रीबाई फुलेमहात्मा जोतीबा फुलेमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार वल्लभभाई पटेलडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनपंतप्रधान नरेंद्र मोदी४सर्वशिक्षा अभियानांतर्गत सुमारे ९ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला होता. त्यातील मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी ८ कोटी ४६ लाखांचे बिल दिले होते व ५४ लाखांचा निधी शिल्लक होता.४जिल्ह्यातील एकूण शाळा ३ हजार ७२९,४यापैकी ७८८ शाळांना फोटोफ्रेम दिल्या.४प्रत्येक शाळेला ५ फोटोंचा संच.४एका फोटोची किंमत रु. १३९५महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे माझ्या नावाने पत्र आले होते. शासनाने सर्व ठरवून दिले होते. सर्व नियमानुसारच झाले आहे. मात्र सदर अधिकाऱ्याला मी सर्वांशी चर्चा करायला सांगितले होते. मात्र त्यांनी कोणाशीही चर्चा न करता सर्व प्रक्रिया केली.- कांतिलाल उमापमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद