शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:49 IST

विदेशातील नागरिकांना भारतीय सण व संस्कृतीचे घडले दर्शन

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनी रशियात उच्चशिक्षणासाठी जातात व भारतीय परंपरेनुसार त्या ठिकाणी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात. यामुळे गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. शिक्षण, व्यापार, नोकरी आदी कारणांनी अनेक भारतीय परदेशात जातात.अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर (नायगाव), काजल भिंताडे (भिवडी), ऋतुजा कुंभारकर (वनपुरी), सायल जगताप (जेजुरी), आर्या पाटील (धनकवडी) या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत असलेल्या या विद्यार्थिनींना सुट्टी मिळत नसल्यामुळे उत्सवासाठी भारतात येता येत नाही.गणपतीविषयी असणारी ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापनादेखील केली आहे. आपण कोठेही असोत मनात भक्तिभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. आम्हाला भारत देशाची आठवण येत असते. आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे, हीच आमची इच्छा आहे. भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न करत असल्याचे काजल चौंडकर हिने सांगितले. भारतीय सण विदेशात साजरे करताना आनंद मनामध्ये असतोच परंतु, घरापासून दूर असल्याची खंतही असते. मात्र, या सणांमधून नवी ऊर्जा, नवी उमेद आणि उत्साह मिळतो. तेथील नागरिकांना भारतीय संस्कृतीची ओळख करुन देता येत असल्याचेही काजल म्हणाली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवrussiaरशियाPurandarपुरंदर