शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरचे विमान अजूनही आकाशातच! प्रक्रिया रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:31 IST

पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया काही महिन्यांपासून रखडली असून, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.

पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया काही महिन्यांपासून रखडली असून, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणूक काळात भूसंपादनाचे काम सुरू केल्यास आणि स्थानिकांकडून त्यास विरोध झाल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी- एमएडीसी) भूसंपादन सुरू करण्याचे निर्देश दिले जात नसल्याचे बोलले जात आहे.राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात पुरंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जमिनीच्या संपादनाची अधिसूचना काढली आहे.तसेच, शासनाने एमएडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. गेल्या वर्षभरात विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या. संरक्षण मंत्रालय, गृह, वित्त, नागरी हवाई वाहतूक संचालनालय या विविध विभागांच्या परवानग्यांचा समावेश आहे. पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, विमानतळासाठी जमीन देण्यास काही शेतकºयांनी विरोध केला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. विमानतळाला होणारा विरोध लक्षात घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भूसंपादन सुरू करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सत्ताधाºयांकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जात नाही.विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाºया परताव्यांचे पर्याय अद्याप निश्चित झालेले नाही. शासन स्तरावर याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना भूसंपादनाच्या बदल्यात काय दिले जाणार, हे अद्याप गुलदस्तातच आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकणार असल्याचे बोलले जाते. एमएडीसीकडून भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त न झालाने भूसंपादनाबाबत काहीच करता येत नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.पुण्यातील लोहगाव येथील विमानतळ हवाईदलाच्या ताब्यात असल्याने तेथून नागरी उड्डाणाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुरंदरचे विमानतळ होऊ घातले आहे. पण त्यामध्ये अडथळे येत आहेत.एमएडीसीकडून अद्याप जिल्हा प्रशासनाला विमानतळाच्या भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळालेली कामेच आचारसंहितेच्या काळात सुरू ठेवता येतात. त्यामुळे आगामी निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी एमएडीसीकडून भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव मिळेल किंवा नाही? याबाबत आता काही सांगता येणार नाही. तसेच,महिना-दोन महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रयंत्रणा द्यावी लागेल. निवडणूक काळात भूसंपादनासाठी स्वतंत्र मन्युष्यबळ देणे शक्य होईल, असे वाटत नाही.- उदयसिंह भोसले,उपजिल्हाधिकारी, भूसंपादन

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमान