शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

पुरंदरचे डाळिंब निघाले युरोपीय बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 01:58 IST

खडतर परिस्थितीवर युवकाची मात; माळरानावर फुलल्या बागा

नीरा : पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्टा हा कायम अवर्षणग्रस्त दुष्काळ पाचवीला पुजल्यासारखी अवस्था. आजही बारा महिने प्यायला पाणी नाही. मात्र येथील युवकांनी या खडतर परिस्थितीवर मात करीत माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. पंधरा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत तसेच राज्याबाहेर डाळिंबाची विक्री केली. यावर्षी विषमुक्त डाळिंबाची संकल्पना यशस्वीरीत्या पेलून युरोपच्या बाजारपेठेत ती पाठवली जात आहेत.गुळुंचे, राख, कर्नलवाडी व वाल्हा गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवरील युवकांना वडिलोपार्जित शेती मोठ्या प्रमाणावर आहे. पण सततच्या दुष्काळामुळे शेती विकून दुसरा व्यवसाय करण्याच्या परिस्थितीत असलेल्या या तरुणांनी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नीरा डाव्या कालव्याशेजारी विहीर घेऊन पाइपलाइन करून शेततळ्यात पाणी साठवून ठिबक सिंचनाद्वारे डाळिंबाची बागा फुलवल्या आहेत. मागील आठ-दहा वर्षांत या भागातील डाळिंब देशभरातील बाजारपेठेत विक्रीसाठी जात होती. हवामानाच्या लहरीपणामुळे वेगवेगळे प्रयोग करून फळ कसे दर्जेदार करता येईल, हे पाहिले जाते.कर्नलवाडीचे युवकांनी यावर्षी आपले डाळिंब परदेशात पाठवायचे, हा निश्चय केला. कोणतीही विषारी औषधांची फवारणी न करता (रेड्यूस फ्री) फळ तयार करून लंडन, आखाती देशात किंवा युरोपियन देशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले. कुरकुंभ येथील भारतीय निर्यातदार आय. एन. आय. फार्मसी या कंपनीमार्फत कालपासून सत्यवान निगडे यांच्या डाळिंबाची निर्यातीसाठी तोड सुरू झाली आहे. सत्यवान निगडे यांच्यासह कर्नलवाडीतील सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे, दीपक जगताप, प्रमोद निगडे, ताराचंद निगडे, बाळासाहेब रणनवरे, ज्ञानेश्वर निगडे, विराज निगडे या तरुण शेतकऱ्यांचे डाळिंब युरोपियन देशांमध्ये जाण्यासाठी सध्या पात्र ठरले असून पुढील काळात यांचे डाळिंब युरोपियन देशांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाणार आहेत.भारतीय बाजारपेठेतून डाळिंबाच्या भावातील चढउतारामुळे आम्हाला अनेकदा तोट्यातच फळबागा सांभाळाव्या लागत. २०१२ पासून उत्तम प्रतीची फळबाग आणि फळे मिळवून नवीन तंत्रज्ञान, शेणखत आणि जैविक खते औषधांचा वापर करून फळबागा फुलवण्यास सुरुवात केली. पुरंदर कृषी खात्याकडून वारंवार मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतातील डाळिंब परदेशात विक्रीस पाठवण्याचा प्रयत्न करीत होता. आज युरोपला आमचे डाळिंब जात आहे, याचा आनंद आहे.- सत्यवान जगन्नाथ निगडे, डाळिंब उत्पादकरेस्युडी फ्री डाळिंब करण्यात निगडेंचा हातखंडा आहे. त्याचं डाळिंब युरोपियन देशांत जायचा मार्ग मिळाला आहे, ९६ रुपये प्रतिकिलो दराने निगडे यांचे चाळीस टन डाळिंब निर्यात होणार आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणावर डाळिंब निर्यात होऊ शकते, त्यामुळे हा परिसर डाळिंबाचे आगार होऊ पाहत आहे. कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर योजनेतून शेतकºयांना डाळिंब लागवडीसाठी अनुदान व सल्ले दिले जात आहेत.-राजेंद्र नलवडे, मंडल कृषी अधिकारी जेजुरी

टॅग्स :FarmerशेतकरीPurandarपुरंदर