शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:49 IST

पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.

जेजुरी : पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या सात गावांच्या परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळउभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने यापूर्वीच सर्व परवानग्या दिलेल्या आहेत; मात्र हवाई दलाची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाचे काम अडले होते.आज हवाई दलानेही पुरंदर विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर लोहगाव विमातळावरून खासगी मालकीची तसेच नागरी वाहतूक करणाºया विमानांची उड्डाणे बंद करण्याच्या अटीवर ना हरकत दाखला दिला असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणकडून सांगण्यात आले.त्यानंतर पुन्हा एकदा बाधित शेतकºयांनी आपला विरोध सुरू केला आहे. आज सकाळी पारगाव येथे परिसरातील बाधित शेतकºयांनी पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, माजी सरपंच व तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेमाणे, पांडुरंग मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, रामदास महाडिक, शांताराम सावंत, लक्ष्मण बोरावके आदींसह एकत्र येऊन विमानतळविरोधी फलक फडकावीत शासनाचा निषेध केला आहे.‘इडा-पीडा टळू दे - विमानतळ जाऊ दे’, ‘जमीन आमच्या हकाची - नाही कोणाच्या बापाची’, ‘जमिनीसाठी जबरदस्ती करू नका - आमच्या जमिनी घेऊ नका’ अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. शासन आम्हाला न विचारता, आमची भूमिका समजून न घेता विमानतळाचा प्रकल्प पुढे रेटत आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही आमची तयारी असल्याचे सांगत बाधित शेतकºयांनी पुन्हा विरोध नोंदविला आहे.का आहे विरोध?पुरंदर तालुक्यातील हा परिसर तसा अवर्षणग्रस्तच होता. पाऊस पडलाच तर येथील शेती पिकत होती.आता मात्र हा परिसर जमिनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. येथे आता बागायती जमिनी निर्माण झाल्या आहेत.नगदी उत्पन्न देणारी पिके, फळबागा, ऊस आदी पिकांतून या परिसरातील शेतकºयांनी आपले संसार फुलवले आहेत.आधुनिक शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय येथील शेतकरी करू लागल्याने येथून विमानतळाला मोठा विरोध निर्माण झालेला आहे.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे