शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

विनोदाचा दर्जा पुलंनी शिकवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:34 IST

विनोदाला दर्जा असतो, हे पुलंनी मला शिकवले. तेव्हापासून आजपर्यंत  प्रत्येक कलाकृतीमध्ये विनोदाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. विनोद  दारासिंगसारखा असावा, उघडा तरी सशक्त आणि दर्जेदार असावा. विनोदी  कलाकृतीला कारुण्याची झालर असेल तर ती अधिक प्रभावीपणे रसिकांच्या  हृदयापर्यंत पोहोचते, असे सांगत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी  विनोदाची सदाबहार सफर रसिकांना घडवली.

ठळक मुद्देसचिन पिळगावकर पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विनोदाला दर्जा असतो, हे पुलंनी मला शिकवले. तेव्हापासून आजपर्यंत  प्रत्येक कलाकृतीमध्ये विनोदाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. विनोद  दारासिंगसारखा असावा, उघडा तरी सशक्त आणि दर्जेदार असावा. विनोदी  कलाकृतीला कारुण्याची झालर असेल तर ती अधिक प्रभावीपणे रसिकांच्या  हृदयापर्यंत पोहोचते, असे सांगत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी  विनोदाची सदाबहार सफर रसिकांना घडवली.चौदाव्या पुलोत्सवामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, गायक सचिन पिळगावकर  यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार’ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. या वेळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मुकुंद  अभ्यंकर, नितीन ढेपे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन आणि सुप्रिया  यांच्याशी अभिनेता स्वप्नील जोशी याने दिलखुलास संवाद साधला.सचिन म्हणाले, ‘माझी आणि विनोदाची ओळख पुलंनी करून दिली. तेव्हा पासून मी त्यांची पुस्तके वाचली आणि विनोदाशी नाते जपत मोठा होत गेलो.  आजवरच्या प्रत्येक पुरस्काराने चेहर्‍यावर स्मित निर्माण केले. मात्र पुलोत्सव  पुरस्काराने डोळ्यांत पाणी तरळले. याबद्दलची भावना शब्दबद्ध करता येणार  नाही, ती केवळ अनुभवता येऊ शकेल.’‘पुलंनी माझ्यासाठी चित्रपट लिहावा, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी  त्यांच्याकडे गेलो. त्यांना ‘ती फुलराणी’बाबत मी सुचवले. ते म्हणाले, ‘आ पण नव्या कलाकृतीबाबत विचार करू या. मी आता जुना झालो आहे.  सध्याच्या पिढीबाबत तुला जास्त माहीत आहे. त्यामुळे तू माझ्याकडून लिहून  घे, मी नक्की लिहीन.’ त्यांचा हाच मोठेपणा मनाला भावला. त्यांनी स्वत:ला  श्रोत्यांना वाहून घेतले होते, असे सांगत त्यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा  दिला.सुप्रिया म्हणाल्या, ‘पुलंचे गुण आपल्यामध्ये झिरपावेत, असा प्रत्येकाचा  प्रयत्न असतो. त्यांचा मिस्कीलपणा, हजरजबाबीपणा अनोखा होता. पुल  आणि सुनीताबाईंसारखे नातेच आमच्या दोघांमध्ये आहे, याचा अभिमान  वाटतो.’

मग आम्हालापण घ्या की सिनेमातगिरीश बापट यांच्या मनोगतानंतर सचिन यांनी ‘बापट साहेब, तुमची  विनोदबुद्धी खूप दांडगी आहे’, असे म्हटल्यावर, ‘मग आम्हालापण घ्या की  सिनेमात’ असे हजरजबाबी उत्तर बापट यांनी देताच प्रेक्षागृहात हशा पिकला.  ‘साहेब, हे सर्व रेकॉर्ड होत आहे, सिनेमासाठी विचारल्यावर नाही म्हणू  नका’, अशी टिपण्णी सचिन यांनी केली.

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने येथे कलाकारांबद्दल प्रचंड प्रेम, आ त्मीयता आणि अभिमान आहे. रंगभूमीचा इतिहास एकत्रित करण्याचे काम  सुरू आहे. महाराष्ट्रात सचिन तेंडुलकर आणि पिळगावकर यांनी इतिहास  घडवला आहे. लोकांच्या खिशातून दोन पैसे काढणे सोपे; मात्र डोळ्यांतून  दोन अश्रू काढणे अवघड असते. तेच पुल आणि सचिन यांना जमले. मलाही  पुल आणि सुनीताबाईंचा सहवास लाभला. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त  सांस्कृतिक खाते आणि कलाकारांसह बैठक घेऊन नियोजन केले जाईल.  जन्मशताब्दीचा दिमाखदार सोहळा पुण्यात पडेल.    - गिरीश बापट, पालकमंत्री  

टॅग्स :Sachin Pilgaonkarसचिन पिळगांवकर