शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा पाणीप्रश्न : पालकमंत्र्यांचे मौन पक्षातील गटबाजीला कंटाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:20 IST

पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

पुणे  - पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाण्याच्या विषयावर जाहीर बोलणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्याच नगरसेवकांमध्ये राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्यानेच कोणी याबाबत बोलण्यास तयार नाही.पुण्यासाठी दररोज घेण्यात येणारे पाणी ११५० एमएडी (दशलक्ष लिटर) करण्याचा निर्णय कालवा समितीत घेण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी लगेचच महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याच्या पाण्याचे नियोजन करीत असल्याचे जाहीर केले. त्याचा प्रतिवाद बापट यांनी त्याच दिवशी संध्याकाळी त्वरित मुंबईतून केला व पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे जाहीर केले. भाजपाच्या या दोन नेत्यांमधील विसंवाद त्या दिवशी प्रथमच उघड झाला. त्यानंतर आजपर्यंत बापट यांनी एकदाही पुण्याच्या पाण्यावर एका शब्दाचेही भाष्य केलेले नाही. महापालिकेच्या पदाधिकाºयांची पाण्याचे नियोजन करताना होत असलेली ससेहोलपटही त्यांनी दुर्लक्षित केलेली दिसत आहे. कालवा समितीत निर्णय झाल्यावर १० नोव्हेंबरनंतर लगेचच जलसंपदाने १ हजार ३५० एमएलडी पाणी देण्यास सुरुवात केली. सलग ५ तासांचा निर्णय घेण्यात आला व तसे जाहीरही करण्यात आले. पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी मागणी नसतानाही पाणी सोडले गेले. त्याकडे राजकीय लक्ष दिले गेले नाही. चांगला पाऊस व धरणात पाणी असतानाही पुण्याचे पाणी कमी करण्यात आले, यावरही कालवा समितीत भाष्य करण्यात आले नाही. पदाधिका-यांमध्ये नाराजी आहे. पाण्याच्या वाढीव कोट्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न होत नसल्याकडे काही भाजपा पदाधिकाºयांकडून लक्ष वेधले जात आहे.पालकमंत्री बापट यांना त्यांच्या पाणी प्रश्नावरील मौनाबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. प्रश्न व्यवस्थित हाताळला जात आहे; त्यामुळे यावर मी बोलण्याचा काहीही संबध नाही, असे ते म्हणाले. पाण्याच्या प्रश्नावर भाजपामध्येच राजकारण होते आहे, याचा इन्कार करीत त्यांनी ती जबाबदारी आम्ही विरोधी पक्षांवर टाकली आहे, असे सांगितले. योग्य वेळ येताच आपण या विषयावर जाहीरपणे बोलू, असे ते म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे