शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉल सुरू असताना अचानक कट होत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. अनेकदा एखाद्याला फोन लावल्यास वेगळाच आवाज ऐकू येत आहे. त्याचबरोबर फोरजी नेटवर्कचा सगळीकडे बोलबाला असताना थ्रीजीवरसुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीय. त्यामुळे पैसे फोरजीचे सुविधा टुजीची अशी परिस्थिती पुणेकरांची झाली आहे. एका क्लृप्तीने लोकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक कॉल हा चालू असताना कट होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमचं नेटवर्क स्ट्राँग आहे, आमचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. फोरजीमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत, अशा मोठ-मोठाल्या जाहिराती करणाºया कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.याविषयी अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, की गेल्या अनेक दिवसांपासून कॉलड्रॉपचा अनुभव मला येतोय. कॉल सुरू असताना अनेकदा कॉल अचानक कट होत आहे. त्याचबरोबर फोन ठेवल्यावर काही सेकंदांनी फोन डिस्कनेक्ट होत आहे. नेटवर्कच्याबाबतीतही सारखाच अनुभव आहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त होत असल्याने इंटरनेट आणि इतर सोशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत आहेत. मुक्ता लेले म्हणाली, की गेल्या दोन महिन्यांपासून मला हा अनुभव येत आहे. मला फोन करणाºयांना माझा फोन बºयाचदा आऊट आॅफ कव्हरेज दाखवत आहे. फोन लागण्यासही अनेक अडचणी येत आहेत.नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फोन केले जातात. मात्र कॉलड्रॉपमुळे बोलणं अर्धवट राहत आहे.हा अनुभव फक्त पुण्यातच येत आहेइतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, की मुंबईमध्ये असताना एकदाही कॉलड्रॉप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास होत आहे. नोकरीमुळे दररोज अनेक लोकांशी संपर्कात राहावे लागते. परंतु कॉलड्रॉपमुळे संवाद सातत्याने खंडित होत असून मनस्ताप वाढत आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारताना कॉलड्रॉपसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनोद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.पुरेसे मोबाईल टॉवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण होत आहेत. नेटवर्क कंपन्यांनी आपल्या ग्राहकांनुसार टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इमारतीवर टॉवर उभारल्याने रेडिएशनचा त्रास होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिक इमारतींवर टॉवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टॉवर पॉलिसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टॉवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जोपर्यंत पुरेसे टॉवर उभारण्यात येणार नाहीत तोपर्यंत ही समस्या कायम राहील.- दीपक शिकारपूर(आयटीतज्ज्ञ)

टॅग्स :Puneपुणे