लोणावळा : पवन मावळातील कठीणगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुंग किल्ल्यावरून आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.इशिता मुकुंद माटे (वय १५, रा. अलसफायर बिल्डिंग, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) असे या मृत मुलीचे नाव आहे. मुंबई येथील पकमार्क इको टूर या कंपनीच्या वतीने आॅनलाइन बुकिंग घेत तुंग किल्ल्यावर एका कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबई येथील दहा व पुण्यातील पाच जणांनी नोंदणी केली होती. आज सकाळी हे सर्व जण तुंग किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्याचा परिसर फिरून खाली उतरत असताना पाय घसरल्याने इशिता खोल दरीत पडली.यामध्ये डोक्याला व हाता-पायाला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
पुण्याच्या मुलीचा दरीत पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 01:32 IST