शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार : फुरसुंगी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:38 IST

महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

ठळक मुद्देबुधवारपासून ओपन डंपिंगच्या विरोधात आंदोलन मुख्यमंत्र्यासह महापालिकेने ग्रामस्थांना कचरा डेपो बंद करण्याबरोबरच येथील विकासकामांची आश्वासने सौरभ राव यांची मागील आठवड्यात नव्याने समाविष्ट ११ गावांच्या प्रश्नांबाबत बैठक कचरा डेपो बंदच्या नावाखाली होणारी महापालिकेची पिळवणूक प्रशासनच सहन करणार नसल्याचे चिन्ह

पुणे: राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डंपिंग बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे १ आॅगस्ट पासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डंपींगच्या विरोधात कचºयाच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पुणे शहराच्या कच-याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार  आहे. दरम्यान, फुरसुंगीमधील आत्तापर्यंत झालेली सर्व बांधकामे नियमित केली जावीत. महापालिका निवडणूका होईपर्यंत पूर्वीप्रमाणे कराची अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागण्यासाठी हा कच-याच्या गाड्या अडविण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे. यावेळी ग्रामस्थांच्या दबावाला बळी न पडण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.  महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. या विरोधात ग्रामस्थांनी देखील वेळोवेळी आंदोलने केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यासह महापालिकेने ग्रामस्थांना कचरा डेपो बंद करण्याबरोबरच येथील विकासकामांची आश्वासने दिली आहे. त्यानुसार महापालिकेकडून ही कामेही सुरू आहेत. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांमधील विकासकामांसाठी प्रशासनाने आत्तापर्यंत कोट्यांवधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, असे असताना आता ग्रामस्थांनी पुन्हा एकदा महापालिकेला वेठीस धरण्याचे पाऊल उचलले आहे. आश्वासनांची पुर्तता न झाल्याचे कारण देत येत्या १ आॅगस्टपासून पुन्हा कचरा डेपो बंद आंदोलनाचा इशारा कृती समितीने महापालिकेला दिला आहे. मात्र कृती समितीने केलेल्या मागण्याही धक्कादायक असल्याचे समोर आले, या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहे. त्यावर आता समितीने आत्तापर्यंत झालेली सर्व बांधकामे नियमित करून त्यांना पालिकेच्या नियमाप्रमाणे करआकारणी करावी. निवडणूक होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे कराची अंमलबजावणी करावी अशा अजब मागण्या करून महापालिकेची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.       दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्यात नव्याने समाविष्ट ११ गावांच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली. त्यात ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये आयुक्तांनी महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार वारंवार सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता कचरा डेपो बंदच्या नावाखाली होणारी महापालिकेची पिळवणूक प्रशासनच सहन करणार नसल्याचे चिन्ह आहे.

टॅग्स :Puneपुणेfursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ राव