शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी अनुभवली आल्हाददायक रात्र अन् सकाळ! थंड पश्चिमी वारे वाहत असल्याने हवेत गारवा

By श्रीकिशन काळे | Updated: May 2, 2024 13:57 IST

पश्चिमी थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डाॅ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत' ला सांगितले....

पुणे : गेल्या महिनाभरपासून पुणेकर दिवसा आणि रात्री उकाड्याने हैराण झाले होते. त्यांना बुधवारी (१ मे) रोजीची रात्री या उकाड्यापासून दिलासा मिळाला. पश्चिमी थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डाॅ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत' ला सांगितले.

राजस्थान-गुजरातहून उष्णवारे वाहत असल्याने पुण्यात व महाराष्ट्रात उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ अनुभवायला मिळाली. दिवसरात्र उष्णतेने पुणेकर हैराण झाले. त्यांना बुधवारी (दि.१) रात्री दिलासा मिळाला. रात्री ११ नंतर अचानक थंड वारे वाहू लागले आणि पुण्यात थंडावा पसरला. हे थंड वारे पश्चिमेकडून येत आहेत. कोकणावरून पुढे पुण्याकडे वाहत असल्याने किमान तापमानात बरीच घट पहायला मिळाली. दररोज किमान तापमान २३-२४ अंश सेल्सिअस नोंदवले जात होते, ते आज सकाळी १८ अंशावर आले. त्यामुळे पुणेकरांची सकाळ आल्हाददायक झाली. परंतु आता हळूहळू पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता डाॅ. कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे शहरातील वडगावशेरी, हडपसर, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागातील किमान तापमान ३० अंशापर्यंत गेले होते. तिथे देखील आता घट झाली आहे. तिथे आज २५-२६ अंशावर तापमानाची नोंद झाली आहे. तर शिवाजीनगरला १८.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. पुण्यातील किमान तापमान हडपसर - २६.२ वडगावशेरी - २५.६ मगरपट्टा - २५.१ कोरेगाव पार्क - २३.५ बारामती - २०.९ शिवाजीनगर - १८.७ लोणावळा - १५.६ 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस