शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पुणेकर गारठले! शहरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, हवेतील गारवा वाढला

By श्रीकिशन काळे | Updated: December 16, 2023 12:26 IST

तसेच इतर ठिकाणी देखील किमान तापमानात घट दिसून येत आहे...

पुणे : दोन दिवसांपासून शहरात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१६) तर दिवसभर हवेतील गारवा खूपच वाढला आहे. सकाळी पाषाण परिसरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतर ठिकाणी देखील किमान तापमानात घट दिसून येत आहे. 

राज्यात आणि पुणे शहरात गारठा वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहणार असून, १७ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या किमान तापमानात मोठी घट होत आहे. विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या खाली आला आहे. रविवारी (दि.१७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी  पहाटेच्या वेळी गारठा वाढलेला जाणवत आहे.दरम्यान रविवारी (दि.१७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

निचांकी किमान तापमान-

पुणे शहरात शनिवारी या हंगामातील निचांकी किमान तापमान पाषाणला १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे पुणेकर गारठून गेले. कडाक्याच्या थंडीचा अनुभव पुणेकर घेत आहेत. येत्या दोन दिवसांत किमान तापमान आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शहरातील किमान तापमान

पाषाण : १०.६एनडीए : १०. ६हवेली : १०.६ शिवाजीनगर: १२.०लवासा : १२.८ कोरेगाव पार्क: १६.२मगरपट्टा: १८.८ 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड