शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:56 IST

सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला.

ठळक मुद्देगानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजनसुस्मिता यांनी सरस्वती वंदना व मीरेचे भजन गात वातावरण केले भक्तीमय

पुणे : सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्ट्स, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. सुस्मिता यांनी सरस्वती वंदना व मीरेचे भजन गात वातावरण भक्तीमय केले. संदीप भट्टाचारीजी यांनी रागस्वरुप उलगडत जाणारी गायकी सादर केली.  प्रारंभी मुलतानी रागातील ‘देश गये’ ही रचना, तर ‘गगन पुरीला मोरी’ ही बंदिश सादर केली. त्यांनी गायलेल्या सोहनी रागातील ‘बेग बेग मन ललचाय’ या रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मिश्र भैरवीतील ‘होरी खेल न कैसे जाऊ’ या रचनेने मैफलीचा समारोप झाला. अविनाश पाटील (तबला), संदीप मिश्रा (सारंगी), ओजस बसरगेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. याप्रसंगी गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, प्रमोद जोशी, मा. कृ.  पारधी आदी उपस्थित होते. प्रियांका भडसावळे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणे