शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पुणेरी पाट्या; आरसा अभिमानाचा अन् स्पष्टवक्तेपणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:16 IST

आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही,’ ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये,’ ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते,’ ‘आमची कोठेही शाखा नाही,’ ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत.

पुणे : आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही,’ ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये,’ ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते,’ ‘आमची कोठेही शाखा नाही,’ ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही,’ ‘आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल,’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या, की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे!पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाचा आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो, पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने शनिवार आणि रविवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजिण्यात आले आहे. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत. पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवतो, चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणीही झळकते याच पाट्यांमधून..! याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही आणि जातपंथवर्णभेद तर मुळीच नाही. अगदी लहान वयाचा एखादा मुलगाही मार्मिक शब्दात भला मोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो असे म्हणू शकतात. पुणेरी काकू एखाद्याची अशी खिल्ली उडवतील, की हास्याचे फवारे उडतील व आजीही नव्या पोरींची अशी फिरकी घेतील, की त्या लाजून चूर होतील. चेष्टा करावी तर त्यातही काही टॅलेंट असावे ही दृष्टी पुणेरी पाट्यांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्याचा खास पुणेरी बाणाही!इथला रिक्षावालाही रिक्षाच्या मागे चिकटू नका, मार बसेल असेलिहून जातो, तर एखादा मालमोटारचालक तेरा मेरा साथ असे १३ मध्येमेरा व नंतर ७ असे अंकांत लिहूनमजा आणतो.>पुणेरी इरसाल पाट्या म्हणजे पुणेकरांचा अभिमान आहे. पुण्याची संस्कृती पुणेरी शैलीत खुमासदार पद्धतीने सांगणारे ते प्रतीक आहे. अशा पाट्या लिहिण्यासाठी आपल्या संस्कृतीचा, वैभवशाली इतिहासाचा जाज्वल्य अभिमानच असावा लागतो. कुत्र्यापासून सावध राहाऐवजी, सावधान, कुत्रा चावरा आहे, असेही इथेच लिहितात. बेल एकदाच वाजवावी, जिना चढताना आवाज करू नये, दरवाजासमोर वाहने लावल्यास पंक्चर केली जातील, अशा मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते. पुण्याशिवाय अन्यत्र कुठे हा अनुभव येणार नाही.>पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. अभिमान आहे मला आणि तुम्हाला पुणेरी असल्याचा! हाच अभिमान आता झळाळून निघणार आहे एका अभिनव स्पर्धेतून! तुमच्या खास पुणेरी शैलीत, कानपिचक्या घेणारी, खुमासदार मार्मिक टिप्पणी (की टोमणा?) करणारी हटके पाटी लिहून आमच्याकडे स्र४ल्ली१्रस्रं३८ं2018 @ॅें्र’.ूङ्मे पाठवा. खासमखास पुणेरी पाट्यांना ‘आकर्षक बक्षिसासह लोकमत’मधून यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल.

टॅग्स :Puneपुणे