शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया स्मार्ट सिटीज राष्ट्रीय पुरस्कारांवर पुण्याची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:26 IST

स्मार्ट क्लिनिक : केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय

ठळक मुद्देस्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड’स्पर्धा केली सुरू स्मार्ट क्लिनिक उपक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्लिनिक सुरू

पाषाण : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कारां’मध्ये पुणेस्मार्ट सिटीने पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाची सामाजिक श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशातील स्मार्ट सिटींनी विविध श्रेणींअंतर्गत राबविलेले प्रकल्प व उपक्रमांद्वारे केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळावी व त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड’ स्पर्धा सुरू केली आहे.स्मार्ट क्लिनिक उपक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्लिनिक सुरू केले. मूलभूत आरोग्य सेवेसाठीच्या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे स्मार्ट क्लिनिक नागरिकांसाठी सोयीस्कर वेळांमध्ये सेवा पुरविते. यामुळे नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. विनामूल्य ‘ओटीसी’ औषधे पुरविण्याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या अनुदानित दराने येथे केल्या जातात. आरोग्य सेवा पुरविण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे एकात्मीकरण विचाराधीन आहे. 

पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाल्या, ‘स्मार्ट क्लिनिकच्या प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार व सन्मान मिळाला ही अत्यंत आनंददायी बाब आहे. स्मार्ट क्लिनिकच्या परिसरातील नागरिकांकडून हा उपक्रम ज्या सकारात्मकतेने स्वीकारला गेला आहे हे लक्षात घेऊन आम्ही पुणे शहरातील इतर आणखी तीन भागांतही हा उपक्रम राबविणार आहोत.’

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारSmart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका