शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 05:07 IST

उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी महानगरपालिकेची नाट्यगृहे उभी राहत आहेत. मात्र, वारजे परिसरात अद्याप एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली जात होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने वारजे उड्डाणपुलालगत ३ एकर जागा सांस्कृतिक वास्तूसाठी आरक्षित केली. मात्र, जागामालकांकडून ही जागा अद्याप ताब्यात मिळाली नसल्याने प्रस्तावित नाट्यगृह रखडले आहे. महानगरपालिकेने जागामालकांना नोटीसही पाठवली आहे.

पुणे : उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी महानगरपालिकेची नाट्यगृहे उभी राहत आहेत. मात्र, वारजे परिसरात अद्याप एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली जात होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने वारजे उड्डाणपुलालगत ३ एकर जागा सांस्कृतिक वास्तूसाठी आरक्षित केली. मात्र, जागामालकांकडून ही जागा अद्याप ताब्यात मिळाली नसल्याने प्रस्तावित नाट्यगृह रखडले आहे. महानगरपालिकेने जागामालकांना नोटीसही पाठवली आहे.सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात रसिकांना विविध कलांचा आस्वाद घेता यावा, यादृष्टीने पुरेशी नाट्यगृहे उपलब्ध आहेत. येथे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, कलादालनांमध्ये चित्रप्रदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो. कलेचा वारसा अनुभवताना त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होते.बदलत्या काळाप्रमाणे पुणे शहराचा विस्तार उपनगरांपर्यंत वाढत आहे. उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने औंध, येरवडा, हडपसर आदी ठिकाणी महानगरपालिकेने काही नाट्यगृहांचे काम सुरू केले आहे, तर काही ठिकाणी नाट्यगृहे प्रस्तावित आहेत. वारजे परिसरातही नाट्यगृहासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. वारजेजवळील शिवणे, धायरी आदी गावे महापालिकेत समाविष्ट होत आहेत. या भागातील रसिकांच्या सोयीसाठी नाट्यगृह उभे राहावे, यासाठी नगरसेवक दिलीप बराटे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.वारजे उड्डाणपुलाजवळ जागासातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने सर्व्हे क्रमांक ९ आणि ११ येथे सांस्कृतिक वास्तूसाठी वारजे उड्डाणपुलाजवळ जागा आरक्षित केली आहे. मात्र, जागामालकांनी ही जागा अद्याप महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेली नाही. महानगरपालिकेने मालकांना एफएसआय अथवा टीडीआर देण्याचा प्रस्तावही पाठवला. मात्र, त्याबाबतही मालकांकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे, महानगरपालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत पालिकेतर्फे लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वारजेतील नागरिकांच्या सोयीसाठी वारजे उड्डाणपुलाच्या शेजारी ३ एकर परिसरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, जागामालकांच्या उदासीनतेमुळे नाट्यगृहाचे काम रखडले आहे. पालिकेकडून याबाबत मालकांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.- दिलीप बराटे,नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका