शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

...तरच जानाई योजनेतून पाणी, अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:15 AM

थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेतकरी अभिनय कुतवळ यांनी दिली.

बारामती - थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेतकरी अभिनय कुतवळ यांनी दिली.सुपे परिसरासाठी वरदान ठरणाºया या योजनेच्या पाण्यासाठी सुपे परिसरातील शेतकºयांनी वीज बील भरण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. १४) सिंचन भवन येथे सुपे परिसरातील शेतकरी पैसे भरण्यासाठी गेले होते. अधिकाºयांनी सोडण्यात येणाºया आवर्तनाच्या बीलाची रक्कम आगाऊ भरली तरच पाणी सोडण्यात येईल अशी भूमीका घेतली. शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. खरिप हंगाम वाया गेला आहे. पाण्याच्या आर्थिक परस्थिती बेताची असताना पैसे जमा केले होते. जानाई योजनेच्या थकित विज बीलामुळे पाणी बंद झाले होते. तीन टप्प्यांमध्ये या योजनेतून पाणी सोडण्यात येते. पहिला व दुसरा टप्पा बारामती आणि दौंड तालुक्यासाठी तर तिसरा टप्पा पुरंदर तालुक्यासाठी आहे. बारामती व दौंड तालुक्याचे मिळून या योजनेचे ४१ लाख रूपये बील थकले होते.तालुक्यासाठी या योजनेतील २८ लाख ४२ हजार रूपये रूपये थकले आहेत. जानाईचे पूर्ण आवर्तन पूर्ण होण्यासाठी ४०० दशलक्ष घनमिटर पाणी लागते. या पाण्यासाठी १५ हजार रूपये दर आला आहे. हा खर्च ६० हजारांवर होता. परंतू यामध्ये शासनाने ८१ टक्के व शेतकºयांनी १९ टक्के रक्कम भरावयाची होती. त्यानुसार हा दर शेतकºयांसाठी १५ हजारांवर आला. या १५ हजारांप्रमाणे ४०० दशलक्ष घनमिटर पाण्याचे ६० लाख रूपये होतात. लोकवर्गणी जमा करून ३५ लाख रूपये रूपये जमवले होते. मात्र अधिकारी म्हणाले आता ३५ लाख भरा म्हणजे थकबाकी जमा होईल.आर्वतनासाठी जसजसे शेतकरी पैसे भरतील तसतसे पाणी देऊ. यावर आता ३५ लाख रूपये भरून घ्या. तर थकबाकीची ६० लाख रूपये रक्कम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जे आवर्तन मिळणार आहे, त्या आवर्तनाआधी भरून घ्या, अशी शेतकºयांनी मागणी केली. आता जर पाणी सोडले तर शासनाला येथील भागासाठी टँकरवर जो एक-दीड कोटी रूपये खर्च येईल तो वाचणार आहे,बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजना, दौंड तालुक्यातील जानाई उपसा सिंचना योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना या संबंधित भागातील जिरायत भागाला वरदान ठरल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून या योजनांना ग्रहण लागले असून वीजबिल थकबाकी, दुरुस्तीला निधी या कारणांमुळे या योजना चालू कमी आणि बंद जास्त राहतात यामुळे या योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये जलसिंचनासह पिण्याच्या पाण्याच्याही टंचाईचा सामना करावा लागतो.येथील शेतकºयांनी लोकवर्गणीतून या योजनेचे वीजबिल भरले आहे. सध्या एका तासाला १ हजार रूपये दर आकारण्यात येतो आहे.सध्या पुरंदर उपसामधून मोरगाव परिसरातील जोगवडी, मोरगाव, मुर्टी, तरडोली, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर आदी भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.शेतक-यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याविषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली असून दुरदर्शीपणा ठेवत मार्ग काढणे गरजेचे आहे.तालुक्याच्या जिरायती भागात पाणी टंचाईची समस्या गंभार झाली आहे. ज्या भागातून टँकरसाठी प्रस्ताव येतील ते तातडीने महसुल विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यातयेणार आहेत. - प्रमोद काळे,गटविकास अधिकारी, बारामतीपंचायत समितीजिरायती भागात पाणीबाणीबारामती : पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊ लागली आहेत. सर्वदूर बरसणारा पाऊस बारामती तालुक्यावर मात्र रूसला आहे. तालुक्याच्या बागायती भागात नीरा डावा कालव्यामुळे शेती तसेच पाणी योजनांना मोठा आधार आहे. मात्र, जिरायती भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. परिणामी जिरायती भागातून ऐन पावसाळ््यात टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. या भागात जणू पाणीबाणी लागू झाल्याचेच चित्र दिसू लागले आहे.बारामती तालुक्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने महिन्याची सरासरी ओलंडली. त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दोन महिने दडी मारली आहे. सध्या तालुक्यामध्ये ३ टँकरने तरडोली, देऊळगाव रसाळ, गाडीखेल, नारोळी आदी गावांसह २१ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुर्टी, पानसरेवाडी, कोळोली, दंडवाडी, सोनवडी सुपे, कारखेल आदी गावांचे टँकरसाठी प्रस्ताव पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली. पावसाअभावी जिरायती भागाचा हक्काचा खरिप हंगाम वाया गेला. पिक नाही, पाणी नाही. माणसाला वेळेवर पाणी मिळणे जिथे दुरापस्थ झाले आहे तिथे जनावरांना पाणी कोठून आणायचे या चिंतेत जिरायती भागातील पशू पालक आहेत. पाणी टंचाईच्या झळांमुळे या परिसरातील जनतेचा रोजचा दिवस पाण्याच्या भटकंतीसह उगवतो. खरिप वाया गेल्याने येथील पशू पालकासमोर चाºयाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. हिरवा चारा मिळणे मुश्किल झाल्याने या परिसरातील शेतकरी ४ हजार रूपये टनाने ऊस घेऊन जनावरे जगवित आहेत. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या