शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha Election 2024 : मतदान केंद्रावर सेल्फी न काढता आल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी

By श्रीकिशन काळे | Updated: November 20, 2024 14:24 IST

केंद्राबाहेर पोलीसांनी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली. अनेक ठिकाणी तर वाद देखील झाले.

पुणे :मतदान केंद्रांवर मतदारांसोबत मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये रोष पहायला मिळाला. मतदान करताना अनेकांना सेल्फी काढायचा असतो, परंतु, मतदान केंद्रावर या वेळी मोबाईल घेऊन जाऊ नये, अशी सक्त ताकीद पोलीसांकडून देण्यात येत होती. परिणामी मतदारांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला.आजकाल मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे फॅड सर्वांना लागले आहे. मतदान केल्यानंतरचा फोटो प्रत्येकाला स्टेट‌सवर ठेवायचा असतो, शेअर करायचा असतो, त्यामुळे अनेकजण मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर गेले. पण केंद्राबाहेर पोलीसांनी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली. अनेक ठिकाणी तर वाद देखील झाले.

मोठ-मोठ्या नेत्यांना आतमध्ये मोबाईलवर फोटो काढू दिले जातात, सेलिब्रेटीला परवानगी असते, मग सामान्य नागरिकांनाच का नाही ? असा सवाल करून अनेकांनी पोलीसांशी हुज्जत घातली. कसब्यातील बहुतांश ठिकाणी मोबाईलवरून वाद झाले. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण पहायला मिळाले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठkothrud-acकोथरुडVotingमतदान