शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'फेकू अधिकारी' म्हणत RTO अजित शिंदेंना रिक्षा चालकांकडून साष्टांग दंडवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:16 IST

शहरात सुरू असणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला होता.

पुणे / प्रतिनिधी / किरण शिंदे: बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांनी शिंदे यांना 'फेकू अधिकारी' म्हणत साष्टांग दंडवत घातला. 

शहरात सुरू असणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला होता. वारंवार सांगूनही, निवेदन देऊनही आरटीओ अधिकारी रिक्षा चालकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान रिक्षा चालक आणि आरटीओ यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला होता. बघतो रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर, काही रिक्षा चालक आणि आरटीओचे अधिकारी यांच्यात रिक्षा चालकांच्या मागण्यावर चर्चा सुरू होती.

चर्चेदरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात कारवाई केली जाईल, यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमले जातील,  कारवाईसाठी आवश्यक असणारे सहकार्य पोलिसांनाही केले जाईल असे सांगितले. दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून हेच आश्वासन देणाऱ्या अजित शिंदे यांच्या या आश्वासनानंतर मात्र रिक्षा चालक संतप्त झाले. 

"तुमच्या प्रत्येक वेळीच्या या फेकू गिरीला, बोलबच्चन गिरीला आम्ही कंटाळलो आहोत. मागील वेळेसही तुम्ही हेच आश्वासन आम्हाला दिले होते परंतु ते पाळले नाही. तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला, तुमच्यासारख्या फेकू अधिकाऱ्यांसह प्रशासनाचा धिक्कार करतो" असे म्हणत रिक्षा चालकांनी आरटीओ अजित शिंदे यांना साष्टांग दंडवत घातला.. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप सोमवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असल्याचे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी यावेळी गितले. त्यानंतर रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला. मात्र येत्या दहा दिवसात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशाराही यावेळी रिक्षा संघटनांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा