शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पुणे: सोशल मीडियाचे उलगडले दुष्परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 05:40 IST

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे

पुणे : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे, हा संदेश मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेतून देण्यात आला. निमित्त होते पुरुषोत्तम महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे. आज सात एकांकिकांचे सादरीकरण झाले.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने नाटक या एकांकिकेतून अभिनयाची तरुणवर्गाची धडपड दाखवली आहे. त्यामध्ये दोन मित्र अभिनयक्षेत्रात येण्यासाठी मुंबईला आॅडिशनसाठी येतात. पण त्या वेळी दोघांपैकी एकाची निवड होते आणि दुसरा आपले व्यक्तिमत्त्व कमी असल्याने मागे पडतो आणि आपण अभिनयात कमी आहोत, या कल्पनेने आत्महत्या करतो. महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाने वाघ येणार आहे, या एकांकिकेतून दोन कलाकारांद्वारे गोष्ट दाखवली आहे. दोन्ही पात्रे रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या कार्यालयात कार्यरत असतात. एक साहेब असतो आणि दुसरा त्या कार्यालयाचा नोकर असतो. साहेब काही कारणामुळे तणावात असल्याने त्याला त्या तणावातून मुक्त करण्यासाठी नोकर एक नाटक रचतो. तो आपल्या कार्यालयाबाहेर एक वाघ आहे, असे सांगून त्या मालकाला घाबरवून सोडतो आणि पूर्ण काळ अडकवून ठेवून शेवटी मी तुम्हाला तणावातून बाहेर काढण्यासाठी हे नाटक केले असे सांगतो.श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाने विवर या एकांकिकेतून दोन स्त्री कलाकारांची आयुष्यावर आणि भावनिक गोष्टींवर चर्चा दाखवली आहे. एका कुटुंबातील महिला आणि एक तरुणी या दोघी वेगवेगळ्या जातीच्या असतात. तरुणी आपली जात, धर्म मानत नसते आणि महिलेला आपल्या धर्माचा खूपच अभिमान असतो. पण शेवटी असा प्रसंग येतो, की तरुणी समोर सर्व जातीभेद विसरून ती आपल्या धर्मासहित इतर धर्माचाही आदर करू लागते.‘दृष्टांत’मध्ये पांडुरंंगाची भक्ती -संताजी महाविद्यालयाने दृष्टांत या एकांकिकेतून पांडुरंगाच्या भक्तीचा आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचा सवांद दोन कलाकारांमध्ये दाखवला आहे. ते दोघे तुकाराम आणि पांडुरंग यांच्याबद्दल आपली मते मांडत होते. तसेच नाटकातून तुकारामांची शिकवण आणि तुकारामांची पांडुरंगाबद्दलची भक्ती यावरही चर्चा करत होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल