शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाने रोखले सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:52 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मात्र, जुन्या वेतननिश्चितीप्रमाणे वेतन द्यावे की सुधारित पदनामानुसार याबाबतचा निर्णय सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतरच कर्मचाºयांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे ५५० कर्मचा-यांच्या पदनामामध्ये बदल करून त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाला खोटा अध्यादेश सादर करून पदनाम बदल व सुधारित वेतन घेतल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी केली. तसेच विद्यापीठातील संबंधित कर्मचाºयांच्या वेतनातून शासनाकडून अदा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती जुन्या पदनामावर करून त्यांना त्याच पदनामाचे वेतन देण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठातील एक हजार २०० पैकी सुमारे ८०० ते ८५० शिक्षकेतर कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन विद्यापीठ प्रशासनाकडून रोखण्यात आले.सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचाºयांच्या वेतनाची रक्कम शासनाकडून पाच ते दहा तारखेपर्यंत बँकेत जमा होते. परंतु, विद्यापीठातील कर्मचाºयांच्या सोईसाठी वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून महिन्याच्या एक तारखेला बँकेत जमा करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर ही विद्यापीठाकडे तिजोरीत वर्ग केली जाते. परंतु, शासनाने पदनाम घोटळ्यात सहभागी असणाºयांचे वेतन वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एका महिन्याला विद्यापीठ फंडातून ६० ते ७० लाख रुपये द्यावे लागतात. घोटाळा झाल्याचे उघड असताना विद्यापीठ फंडातून एवढी मोठी रक्कम देणे योग्य नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने वेतन रोखण्याचा निर्णय घेतला. पदनाम घोटाळा प्रकरणातील कर्मचाºयांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाने बदललेल्या पदनामानुसार वेतन अदा करावे, असे निवेदन काही संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. परंतु, वेतनाबाबत निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आहेत. त्यामुळे सोमवारी (दि. ४) वेतनाचा विषय त्यांच्यासमोर ठेवला जाणार आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. बहुतांश कर्मचाºयांना कर्जाचे हप्ते भरावे लागतात. त्यामुळे वेतन रोखू नये, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. मात्र, वेतन न देता कर्मचाºयांना अग्रीम रक्कम (अ‍ॅडव्हान्स) देण्याचा मार्ग काढण्यात आला.पदनाम बदल वेतन पूर्ववत करून सुधारित वेतन करण्याचा शासनाचा आदेश आहे. परंतु, अंतिम वेतननिश्चितीसाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ४) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सर्व वस्तूस्थिती ठेवली जाईल. कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन अदा करावे किंवा करू नये. करायचे झाल्यास कोणत्या पद्धतीने करावे, यावर व्यवस्थापन परिषदेने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव प्रशासनातर्फे व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जाईल. परंतु, कर्मचाºयांची आर्थिक अडचण होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून अग्रीम रक्कम दिली जाईल.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपदनाम घोटाळ्याचे लेखापरीक्षण करण्याचे काम पूर्ण होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांना अग्रीम रक्कम देण्याचा मार्ग विद्यापीठाने स्वीकारला आहे. त्यातच येत्या ८ फेब्रुवारीला न्यायालयात पदनाम घोटाळ्याबाबत पुढील सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्णय देणार, त्यावर विद्यापीठातील कर्मचाºयांच्या वेतनाचे भवितव्य अवलंबून आहे, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.550 कर्मचाºयांच्या पदनामामध्ये बदल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे ५५० कर्मचा-यांच्या पदनामामध्ये बदल करून त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली.एका महिन्याला विद्यापीठ फंडातून ६० ते ७० लाख रुपये द्यावे लागतात. ४ फेब्रुवारी रोजी वेतनाचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवलाजाणार आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे