शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; विद्यार्थ्यांनो अंदाजित तारखाही ठरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 21:27 IST

Pune University Exam: परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ आहे.

 - राहुल शिंदेपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार  आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत मंगळवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (Pune university Exam will be conduct from 15-20 March via online.)

 पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ आहे. त्यात कोरोनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. कोरोना काळात विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने २०१९-२०२० शैक्षणिक वर्षातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. सुरवातीला या परीक्षा घेताना अडचणी आल्या असल्या तरी ; काही कालावधीनंतर त्यात सुधारणा झाल्या.

पुणे विद्यापीठाने कोरोनामुळे अंतिमवर्षाच्या विद्यार्थ्यांसह अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्याने वेळेची बचत होणार आहे. तसेच महिन्याभरात विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेचा निकाल देणे शक्य होणार आहे. त्यामुळे २०२१- २१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. 

कोरोनामुळे लांबलेल्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत मंगळवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ ते २० मार्च या कालावधीत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा ३० मार्चपासून सुरु करावी, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठविद्यापीठातर्फे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असल्या तरी या परीक्षांसाठी विद्यापीठाने जुन्या एजन्सीला परीक्षेचे काम देण्यापूर्वी कमी दरामध्ये काम करणा-या एजन्सीची चाचपणी करावी.- राजेश पांडे,व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे