शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 2:28 PM

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन, तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी...

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात साप दाखवून पैसे उकळण्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन, तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलनचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

 करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध सोमेश्वर देवस्थान मंदिरात मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या भाविकांकडून पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्वराचे दर्शन दिले जात असल्याचा व्हिडीओ एका जागृक भाविकाने व्हायरल केला. त्यानंतर सोमेश्वरनगर परिसरात बुधवारी (दि. १४) एकच खळबळ उडाली.

 महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. येथे सर्परुपी सोमेश्वराने दर्शन दिल्यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परंतु, देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब आत्माराम भांडवलकर हे भाविकांकडून पैसे घेऊन सोमेश्वराचे दर्शन देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाने बुधवारी सकाळी तातडीने बैठक घेऊन बाळासाहेब भांडवलकर यांच्याकडून याबाबतचा खुलासा मागितला. या खुलाशानंतर तो खुलासा धर्मादाय आयुक्तांकडे पाठवून देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विश्वस्तावर कारवाई करण्यात येईल, असे देवस्थान कडून सांगण्यात आले.

या अगोदरही याठिकाणी असे प्रकार घडले असल्याचे अनेकांनी खासगीत सांगितले. या देवस्थान ट्रस्टला राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

...नक्की कारवाई केली जाईल-

अ‍ॅड. गणेश आळंदीकर : सोमेश्वर देवस्थान मंदिराचा मी विश्वस्त झाल्यानंतरची  विश्वस्तपदातील पहिलीच महाशिवरात्र काल होती. काही चुकीची कामे होत असतील, तर  त्यावर नक्की उपाययोजना करू. चुकीची कामे करणाºयांना सर्व विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास त्या बाबी आणून नक्की कारवाई केली जाईल.

...घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय 

 विनोद भांडवलकर (अध्यक्ष, सोमेश्वर देवस्थान) : घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या बाबत विश्वस्त मंडळाची तातडीची मिटिंग घेऊन यामध्ये संबंधित पुजाºयाला खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा न दिल्यास धर्मदाय आयुक्तांकडे हे प्रकरण दिले जाईल.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती