शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : विधी सल्लागारासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात, हरकतीवर अनुकल अहवालासाठी मागितले ४० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 23:52 IST

प्रथमच अशा प्रकारची कारवाई

पुणे : नवीन इमारतीमधील वीजेच्या मीटराबाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकुल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारा विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार (रास्ता पेठ कार्यालय) आणि सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारणासाठी लाच घेतली जात असल्याचे प्रथमच उघड झाले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची अशी पहिलीच कारवाई आहे.

याबाबतची माहिती अशी, पिंपरी गावातील जमीन एका बांधकाम व्यावसायिकाने विकसित केली होती. इमारत बांधून झाल्यानंतर जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या नवीन इमारतींमध्ये इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी अर्ज केला होता. जागा मालकाने त्यातील ११ इलेक्ट्रिक मीटर्स घेण्यावर हरकत घेतली होती. कायदेशीर वाद निर्माण झाल्याने महावितरणच्या गणेशखिंड विभागातील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यांनी ते रास्ता पेठ कार्यालयात सत्यजीत पवार यांच्याकडे पाठविले होते.

या दोघांनी त्या हरकतीवर अनुकुल अहवाल देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १८ व १९ जानेवारीला पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBribe Caseलाच प्रकरण