शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

स्मार्ट सिटी मानांकनात पुण्याला फटका : राष्ट्रवादीच्या काळात उद्घाटन, भाजपाच्या काळात २८ व्या क्रमांकावर घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 20:38 IST

निधीच्या विनियोगाचे नियोजन न केल्याने व नवीन प्रकल्पांचा अभाव यामुळे मानांकन क्रमवारीत झटका

ठळक मुद्देयंदा नाशिकने पुण्याला मागे टाकत मिळविला १५ वा क्रमांक

पुणे : पालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना सुरु झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची सत्ताधारी भाजपाच्या काळात मात्र घसरण झाली असून केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या  ‘रँकिंग’मध्ये पुणेस्मार्ट सिटी थेट २८ क्रमांकावर गेली आहे. निधीच्या विनियोगाचे न केलेले नियोजन आणि नव्या प्रकल्पांचा अभाव यामुळे हे मानांकन घसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१६ रोजी १४ प्रकल्पांसह स्मार्ट सिटीचे पुण्यात उद्घाटन झाले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण - डोंबिवली आणि औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे. यंदा नाशिकने पुण्याला मागे टाकत १५ वा क्रमांक मिळविला आहे. तर, पिंपरी चिंचवड तब्बल ६१ व्या स्थानी गेले आहे. स्मार्टसिटी अंतर्गत पुण्यामध्ये कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. यासोबतच रस्ते, ई-बस, वाहतूक पोलिसांना  मोटारसायकली पुरविणे, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ क्लिनिक्स,  लाईट हाऊस, प्लेसमेकिंग आदी प्रकल्प करण्यात आले आहेत. यावर स्मार्ट सिटीकडून ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. विविध प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही यापुर्वी झाली आहे. ====स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत केंद्र शासनाकडून पुण्याला दरवर्षी १०० कोटींचा निधी मिळतो. राज्य सरकार आणि पालिका ५० कोटी रुपयांचे अनुदान देते. अशा प्रकारे दरवर्षी २०० कोटी रुपये जमा होतात. या निधीमधील ६० टक्के रकमेचा विनियोग करणे आवश्यक असून त्यानंतरच पुढील रक्कम मिळते. गेल्या पाच वर्षात एक हजार कोटी रुपये मिळाले. स्मार्ट सिटीने सुरुवातीच्या तीन वर्षातील ६०० कोटी रुपयांचा विनियोगच केला नाही. ४०० कोटी रुपयेच खर्च झाल्याने पुढील रक्कम मिळण्यावर  मर्यादा आल्या आहेत. =====स्मार्ट सिटीचे पीपीपी तत्वावर निश्चित केलेले काही प्रकल्प अद्याप सुरु झालेले नाहीत. सुरु न झालेल्या प्रकल्पांविषयी केंद्र शासनाने माहिती घेतली. त्यामुळे मानांकन घसरल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. महत्वाचे प्रकल्प संचालक मंडळाची मंजुरी घेऊन सुरु करण्याची कार्यवाही केली जाईल. मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.- रुबल अगरवाल, मुख्य कार्यकारी 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका