शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना द्यावे १७ टीएमसी पाणी; महापालिकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 04:46 IST

महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात येत असून महापालिकेने वाढीव पाणीकोटा मागणारा प्रस्ताव दिला आहे.

पुणे : महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात येत असून महापालिकेने वाढीव पाणीकोटा मागणारा प्रस्ताव दिला आहे. पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात असून शहराला सुधारित करार करून प्रतिदिन १३३४.५० एमएलडीप्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणी पालिकेने पत्राद्वारे केली आहे.पाण्याचा कोटा वाढवून घेण्यासाठी पालिकेला शहराच्या लोकसंख्येने ५० लाखांचा टप्पा पार केल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने जिल्हा मतदान विभाग, आधार नोंदणी कार्यालय, आरोग्य विभागासह लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या शासकीय यंत्रणांकडून माहिती मागविली होती. या माहितीच्या आधारे निश्चित केलेल्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणी कोट्याची मागणी करण्यात आली आहे.जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सुनावणीनंतर निर्माण झालेल्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहराच्या पाणी वापरावरून जलसंपदा विभाग आणि पालिका आमनेसामने उभे ठाकले होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव देण्यात आला आहे. पाणी वापराच्या ठरविण्यात आलेल्या मानकांनुसार ५० लाख लोकसंख्या असलेल्या शहराला १३५ लिटर पाणी प्रतिव्यक्ती देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेचा पाणी वापर दुप्पट आहे. त्यामुळे महापालिकेने वर्षाला ८.१९ टीएमसी पाणी घेण्याचे आदेश जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने लोकसंख्येच्या आधारावर दिले होते. शहराची लोकसंख्या ४८ लाख गृहीत धरून ११.५० टीएमसी पाणी कोटा प्रतिवर्षी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. तुर्तास मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या मध्यस्तीमुळे पुण्याच्या पाण्यात कपात झालेली नाही.मात्र, ही परिस्थिती किती दिवस राहील, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. ग्रामीण भागातील पाण्याची मागणी, शहराची आवश्यकता आणि उपलब्ध पाणीसाठा याची सांगड घालण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे.योजनेतून ४० टक्के पाण्याची गळती थांबविणारसध्या शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या योजनेमधून ४० टक्के पाण्याची गळती थांबवणार आहे. तसेच पाणी चोरीचे प्रमाण १५ टक्क्यांवर आणण्याकरिता जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.महापालिकेने जलसंपदा विभागाला पाठविलेल्या पत्रामध्ये शहराला सध्या दर दिवसाला १३३४.५० एलएलडी (वार्षिक १७ टीएमसी) पाणी आवश्यक असून नवीन करार करताना, खडकवासला धरणसाखळी व भामा-आसखेड धरण असा एकत्रितरित्या १७ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी पालिकेने या पत्रामध्ये केली आहे.

टॅग्स :Puneपुणे