शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पुणे : विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित, मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 05:37 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.सिंहगड शिक्षण संस्थेतील अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी मागील दहा दिवसांपासून विद्यापीठात उपोषणाला बसले आहे. अध्यापनाचे काम बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार आहे. शनिवारी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली; तसेच प्राध्यापकांच्याही मागण्या त्यांची भेट घेऊन समजून घेतल्या. त्यानंतर कुलकर्णी यांनी कुलगुरू नितीन करमळकर यांची प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधींसह भेट घेतली. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी करमळकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक दि. २८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या बैठकीत सिंहगडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत; तसेच अध्यापनाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण २८ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन-पुणे : वर्ग सुरू व्हावेत, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपोषणाला बसलेल्या सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. पवार यांनी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.दि. ६ मार्चपासून परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली. शरद पवार यांनी केंद्र, राज्य सरकार, संस्थेचे शिक्षक आणि संस्थाचालक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. या वेळी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अभिषेक बोके, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आदेश गाडे, भाग्येश क्षीरसागर, अमोल नेवसे, अभिजित कोलते, तेजस जाधव, नसीन शेख, भूषण डबाळे, रवीकांत वर्पे, मारुती अवगंड आदी उपस्थित होते.

टॅग्स :sinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटStudentविद्यार्थीSharad Pawarशरद पवार