शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रुपड्यातील पुणे-सिकंदराबाद...!; अनिल शिरोळे यांनी दाखविला हिरवा कंदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:16 IST

अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.

ठळक मुद्देपुणे विभागातर्फे ‘प्रोजेक्ट स्वर्ण’ अंतर्गत शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली नव्या रुपातपुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणारी ही गाडी सिकंदराबाद येथे पोहचणार २ वाजून २० मिनिटांनी

पुणे : अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. शिरोळे यांच्यासह रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शताब्दी एक्सप्रेसला हिरवा कंदिल दाखवला.पुणे विभागातर्फे ‘प्रोजेक्ट स्वर्ण’ अंतर्गत शताब्दी एक्सप्रेस नव्या रुपात सुरू करण्यात आली आहे. या गाडीतील डब्यांमधील बैठक व्यवस्था नावीन्यपूर्ण आहे. डब्यांमध्ये रेड कारपेट अंथरले असून ही गाडी धूळ विरहीत आहे. गाडीच्या सजावटीमुळे व आकर्षक बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाडीत महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या संस्कृतीचे व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या पेंटिंग आहेत. गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दृष्टीहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये बैठक क्रमांकाची व्यवस्था केली आहे. उच्च श्रेणी वर्ग प्रवाशी डब्यांमध्ये वायफाय व्यवस्था बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधांची माहिती देणारा सुचना फलक लावले आहेत. पुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणारी ही गाडी सिकंदराबाद येथे २ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.

अनिल शिरोळे यांनी नव्या रुपात सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले. तर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी शताब्दी एक्सप्रेसमधील सोई-सुविधांची माहिती दिली. पुणे स्टेशन येथे आयोजित शताब्दी एक्सप्रेसच्या शुभारंभाच्या कार्याक्रमास रेल्वेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :anil shiroleअनिल शिरोळेPuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी