शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पुणे : सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात आंदोलन, ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:30 IST

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्धवस्त करणारा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीत असा हा फेस्टिव्हल होणे म्हणजे संस्कृती नष्ट करण्याचाच प्रकार होय. सनबर्न फेस्टिव्हलला विरोध म्हणून चांदणी चौकात बावधन, लवळे, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांनी संस्कृतीरक्षण आंदोलन केले.

पुणे : सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्धवस्त करणारा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीत असा हा फेस्टिव्हल होणे म्हणजे संस्कृती नष्ट करण्याचाच प्रकार होय. सनबर्न फेस्टिव्हलला विरोध म्हणून चांदणी चौकात बावधन, लवळे, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांनी संस्कृतीरक्षण आंदोलन केले. या प्रसंगी सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या, तसेच सनबर्न फेस्टिव्हलच्या विकृतीच्या विरोधात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधातील मत परखडपणे मांडून कार्यक्रमाच्या आयोजकांची करचुकवेगिरी, दांभिकपणा आणि केलेली सरकारी नियमांची पायमल्ली यांवर टीका केली. आंदोलनकर्त्यांनी सनबर्न फेस्टिव्हल ला केवळ पुण्यातूनच नाही, तर भारतातून हद्दपार करण्याचा निर्धार केला. आंदोलनामध्ये एका छोट्या जिवंत देखाव्याद्वारे पाश्चात्त्य विकृतीच्या प्रभावामुळे व्यसनांच्या आहारी जात असलेले तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यात संस्कृतीचे पालन आणि रक्षण करणारे तरुण दाखवून युवा पिढीने व्यसनाधीनता आणि संस्कृती यांपैकी कशाची निवड करायची, ते ठरवावे, असे आवाहन करण्यात येत होते. या वेळी वाहतुकीला अडथळा न होता प्रातिनिधीक स्वरुपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

   कार्यक्रमस्थळापासून जवळच डीआरडीओची उच्च ऊर्जा सामग्री अनुसंधान प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत अतिसंवेदनशील आणि उच्च ऊर्जा असलेल्या सामग्रीवर चाचणी आणि संशोधन केले जाते. अशा अतिसंवेदनशील भागात कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात येणाºया परदेशी नागरिकांच्या माध्यमातून आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी केसनंद येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या मंचाला मोठी आग लागली होती. तेथे आगप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नव्हती. नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरक्षेच्या कारणास्तव वायुदल आणि विमानतळ प्राधिकरणाने यंदा सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती दिली नव्हती. आयोजकांनी याआधी करचुकवेगिरी करून गोवा शासनाची फसवणूक केली आणि तिथून पळ काढला. आता पुण्यातही त्याची पुनरावृत्ती करून पुण्यातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत अडकवून येथूनही शासनाचे पैसे बुडीत करून पळ काढल्यास प्रशासनाला कोणता महसूल मिळणार आहे ? या गोष्टींचा विचार करता शासन इतक्या सहजतेने आणि निर्धास्तपणे सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती का देत आहे ?, या प्रश्नावर वक्त्यांनी  लक्ष वेधले. ग्रामस्थांनी सनबर्न फेस्टिव्हल कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याची आणि कार्यक्रमस्थळी एकही गाडी जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे़                                                 

आंदोलनामध्ये  नगरसेवक किरण दगडे-पाटील, बावधनच्या सरपंच  पियुषा दगडे-पाटील, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष  चंद्रकांत वारघडे, बावधनचे माजी सरपंच राहुल दुधाळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन दगडे, आझाद दगडे, वैशाली दगडे, वैभव मुरकुटे, सचिन धनदुडे, सुनील दगडे, धनंजय दगडे, गणेश कोकाटे, उमेश कांबळे, वैशाली कांबळे, निळकंठ बजाज, दीपक दुधाणे, नितीन दगडे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे शंभू गवारे यांच्यासह ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल