शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले

By राजू इनामदार | Updated: March 12, 2025 10:55 IST

पक्षत्यागाचे प्रमाण वाढले : आघाडीचा शक्तीपात तर युती ताकदवान

पुणे : एकएक पान गळावया लागले, अशी पानगळती ऐन चैत्रपालवीच्या वेळी महाविकास आघाडीवर आली आहे. नवी पालवी फुटणे दूरच, आहे ती पाने सांभाळून कशी ठेवायची, असा प्रश्न नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. सत्ता नसल्याने आघाडीचा राजकीय शक्तीपात होत असून, त्यातच महापालिका निवडणूकही लांबणीवर पडल्याने दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील इच्छुक कार्यकर्ते दूर जाऊ लागले आहेत. महायुतीत आवक वाढल्याने त्यांचा मात्र राजकीय जोर वाढत आहे.आघाडीत पळापळकाँग्रेसचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या एकाच वेळी ५ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला जवळ केले. याच पक्षाचे राजेश पळसकर यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमधीलच युवक शाखेचे काही स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षातून, तर फुटीच्या वेळेसच अनेक माजी नगरसेवकांनी आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत अजित पवार यांच्या पक्षात उडी घेतली. शरद पवार यांच्या समवेत असलेले अजूनही काही जण अजित पवार यांच्याकडे आशेने पाहत आहेत. तिथेच खरे भवितव्य असल्याची खात्री त्यांना पटू लागल्याचे दिसत आहे.महापालिका निवडणुकीचे कारणएकूणच महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस या तीनही पक्षांच्या शहर शाखांमधून बरेच जण बाहेर पडत आहेत. त्या तुलनेत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची राजकीय स्थिती भक्कम होत चालल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी यामागे आहे. न्यायालयीन कारणांमुळे आता ही निवडणूक किमान या वर्षात होत नाही, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याआधीच स्वत:ची राजकीय स्थिती भक्कम करून घेण्याकडे बहुसंख्य माजी नगरसेवकांचा, तसेच नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांचा प्रयत्न आहे.महायुतीकडेच कलसद्य:स्थितीत महायुती राजकीय दृष्ट्या भक्कम स्थितीत आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष भाजप आहे. त्याखालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यामुळेच भाजपकडे अनेकांचा कल आहे. ठाकरे सेनेतून एकदम ५ नगरसेवक भाजपकडे जाण्यामागे तिथून निवडून येण्याची हमी हेच कारण आहे. धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर लोकसभा व मग विधानसभा निवडणूकही त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या विरोधात लढवली. त्यामुळे भाजपचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे धंगेकर यांनी शिंदेसेनेची निवड केली असल्याची चर्चा आहे.हे नाही तर ते पण युतीचमहापालिकेची आगामी निवडणूक अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लढवायची आहे. त्यांची सलग तीन वर्षे प्रतिक्षा करण्यात गेली. निवडणूक होणार अशा वावड्या उठल्या व त्यात त्यांचा बराच खर्चही झाला आहे. आता उभे रहायचे तर निवडून येण्यासाठीच असा त्यांचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणूक एकत्र लढले तर ठीकच पण वेगवेगळे लढले तरीही युतीत तीन पक्ष असल्याने हे नाही तर ते, पण आधी आघाडीतून तर बाहेर पडू अशा विचारात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती