शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"गज्या मारणे टोळीला आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का लागणार"; पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा इशारा

By विवेक भुसे | Updated: October 12, 2022 16:08 IST

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा इशारा...

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील १४ जणांवर पुणे पोलिसांनी माेक्का कारवाई केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गज्या मारणे व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. त्यामुळे या गुंडांना आश्रय देणारे, सहाय्य करणारे, आर्थिक मदत करणारे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावरही मोक्का कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

मुळचे सांगलीचे असणारे व सिंहगड रोडवर राहणारे फिर्यादी यांचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सांगलीच्या हेमंत पाटील याने त्यांच्याकडे ४ कोटी रुपये गुंतवणूकीसाठी दिले होते. शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते. तेव्हा हेमंत पाटील व गज्या मारणे टोळीने त्यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन ४ कोटी रुपयांचे आता २० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. याचा खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करुन त्यातील चौघांना अटक केली आहे. गुन्हा दाखल होत असल्याचे समजल्यावर गज्या मारणे व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. या १४ जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे.

तळोजा कारागृहातून सुटल्यावर गज्या मारणे याची त्याच्या टोळीने मुंबई -पुणे महामार्गावर रॅली काढून दहशत माजविली होती. त्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हा गज्या मारणे हा फरार झाला होता. तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला सातारा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला वर्षभर स्थानबद्ध केले होते. मार्च महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कायम असल्याचे आढळून आले. सध्या तो फरार आहे. त्याला इतर कोणाची मदत मिळू नये व त्याच्या नाड्या आवळता याव्या, यासाठी त्याला मदत करणार्यांवरही मोक्का कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड