शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’

By राजू हिंगे | Updated: February 2, 2025 18:57 IST

पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत.

पुणे : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन शिंदेसेनेने पुणे शहरात ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी उद्धवसेना आणि काँग्रेसमधील नाराजांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये शिंदेसेनेमध्ये पुणे शहरातील दोन माजी आमदार आणि काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेसेनेकडून केला जात आहे.

पुणे शहरातील शिवसेनेचे दहा नगरसवेक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन गट पडले. त्याचवेळी शिंदेसेनेमध्ये माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे गेले. ते पुढे शिंदेसेेनेचे शहर प्रमुख म्हणुन काम करत आहे. त्यानंतर उद्धवसेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुणे शहरात ताकद वाढविण्यासाठी शिंदेसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मिशन पुणेअंर्तगत शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, आमदार, मंत्रीकडून फिल्डिंग लावली जात आहे. त्यात नाराज आणि इच्छुक व्यक्तींना आपल्याकडे कसे घेता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्धवसेना आणि काँग्रेसमधील नाराजांना पक्षात घेण्यासाठी मोर्चबांधणी सुरू आहे.

पालिक निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे प्रवेश लांबलेस्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वाेच्च न्यायालयात याचिका आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत.

शिंदेसेनेमध्ये अनेक पक्षातील माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार हे प्रवेश होतील. - प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख, शिंदेसेना

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Votingमतदान