शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे आता राज्यातील सर्वात मोठे शहर, मुंबईलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 05:47 IST

हद्दीत २३ गावांचा समावेश; मुंबईलाही टाकले मागे

ठळक मुद्देपुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ३४ गावे पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला.

पुणे : महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यासंदर्भातली अधिसूचना अखेरीस राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने बुधवारी काढली. त्यामुळे सर्वाधिक क्षेत्रफळाचे शहर म्हणून पुण्याने मुंबईलाही मागे टाकले असून, पुणे हे आता राज्यातील सर्वांत मोठे शहर बनले आहे. मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किलोमीटर असून, पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल ५१८.१६ चौरस किलोमीटर झाले आहे. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची समीकरणे कितपत बदलणार याची आता उत्सुकता असेल.

पुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ३४ गावे पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. २०१४ साली राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गावे समाविष्ट करून घेण्यास उशीर लागत असल्यामुळे ग्रामस्थ न्यायालयात गेले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. २०२० सालापर्यंत ३४ गावे समाविष्ट करून घेण्याबाबत राज्य सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले होते. राज्य शासनातर्फे अखेर ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

या गावांच्या समावेशानंतर येथील पायाभूत सुविधांवर पालिकेला काम करावे लागणार आहे. पाणी, मलनिस्सारण, शिक्षण आदी सुविधा उभारताना त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे. या गावांमधील अंदाजे लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे. यातील बहुतांश गावांचा विकास आराखडा तयार झालेला आहे.  या आराखड्याला अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही. आता या गावांचा नवीन स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार की ‘पीएमआरडीए’चाच आराखडा लागू होणार का, याबाबत अस्पष्टता आहे.

ही गावे आली पुण्यातम्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, नांदोशी, सणसनगर, मांडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

टॅग्स :Puneपुणे