पुणे - जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट करताना, “काही तालुक्यांत एकत्र, तर काही तालुक्यांत वेगळे लढण्याचा पर्याय खुला आहे” असे संकेत दिले.
रोहित पवार म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात असताना स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. निवडणूक कशा पद्धतीने लढायची, आघाडी करायची की स्वतंत्र लढायचं, याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
आज झालेल्या बैठकीच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे काही पदाधिकारी उपस्थित होते. “निवडणूक एकत्र लढवावी” अशी मागणी करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही यावेळी आले होते. त्यांच्या भावनांचा आणि इच्छांचा आदर ठेवतच आम्ही या बैठकीत सहभागी झालो, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर काही तालुक्यांत आम्ही एकत्र लढू शकतो, तर काही तालुक्यांत वेगवेगळे लढण्याचा निर्णयही होऊ शकतो. तसेच निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची, हेदेखील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठरवतील.”
इच्छुक आणि ताकतवान उमेदवारांवर चर्चाया बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोण इच्छुक आहे, कोण ताकतवान उमेदवार आहे आणि कोण निवडून येऊ शकतो, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली. स्थानिक राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांची भूमिका लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सूचित केले.
Web Summary : Ahead of ZP elections, Rohit Pawar indicated flexibility: contesting together or separately depending on local dynamics and worker preferences. Discussions involved potential candidates and strategies.
Web Summary : जिला परिषद चुनावों से पहले, रोहित पवार ने लचीलापन दर्शाया: स्थानीय गतिशीलता और कार्यकर्ताओं की पसंद के अनुसार मिलकर या अलग चुनाव लड़ने का संकेत दिया। संभावित उम्मीदवारों और रणनीतियों पर चर्चा हुई।