शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune News: व्हिआयपी पास न मिळाल्याने महापौरांची मंत्र्यांच्या स्वागताला गैरहजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:13 IST

- प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना

पुणे : पुणे विमानतळावर प्रवेश पास मिळाला नसल्याने महापौर मंजूषा नागपुरे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा सूचना महापौरांनी महापालिका आयुक्तांना केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.शहरात येणाऱ्या मंत्री महोदयांचे स्वागत शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर विमानतळावर करतात. त्यासाठी महापौरांचा तीन वर्षांसाठी विमानतळ प्रवेशाचा व्हीआयपी पास काढला जातो. यासाठी महापौरांचे फोटो, आधारकार्ड, निवडीचे पत्र आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही झाल्या आहेत. मात्र, महापौैर मंजूषा नागपुरे यांचा विमानतळाचा प्रवेश पास अद्यापही काढण्यात आलेला नाही.दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी महापौर कार्यालयाने विमानतळ प्रवेश पास काढण्याबाबत प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अल्पावधीत पास काढणे शक्य झाले नसल्याने महापौर मंत्र्यांच्या स्वागताला जाऊ शकल्या नाहीत. यामुळे चिडलेल्या महापौरांनी संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्याची चर्चा रंगली आहे.चाैकट

राजशिष्टाचार अधिकाऱ्यांचे पद रिक्तच; कारवाई करणार कुणावर?महापौरांचा व्हीआयपी पास काढण्याची जबाबदारी राजशिष्टाचार अधिकाऱ्यांची असते. महापौर कार्यालयाचे राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले या नगरसचिव झाल्याने राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे. या पदाची प्रभारी जबाबदारी कोणाकडेही दिलेली नाही. त्यामुळे पास काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor misses minister's welcome due to VIP pass delay.

Web Summary : Pune Mayor Nagpure missed welcoming Minister Bawnakule due to a delayed VIP pass. Action against the public relations officer is considered. The Rajshisthachar officer post is vacant, raising questions about responsibility.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMayorमहापौरMunicipal Corporationनगर पालिका