शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Video : एकुलत्या एक लेकाला बिबट्याने डोळ्यादेखत उचलून नेलं; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले

By किरण शिंदे | Updated: December 16, 2025 18:17 IST

 मुलावर हल्ला होत असल्याचं पाहताच ही माऊली जीवाच्या आकांताने धावली. तिने बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. मात्र तोपर्यंत बिबट्या रोहितला घेऊन उसात पसार झाला होता.

पुणे -पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या पारगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने मुलावर झडप घातली. रोहित कापरे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. रोहितचे आई-वडील शेतमजूर असून ते कांदा लागवडीचं काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि उसाच्या दिशेने फरफटत नेलं. हा संपूर्ण थरार रोहितच्या आईच्या डोळ्यासमोर घडला.  मुलावर हल्ला होत असल्याचं पाहताच ही माऊली जीवाच्या आकांताने धावली. तिने बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. मात्र तोपर्यंत बिबट्या रोहितला घेऊन उसात पसार झाला होता.

दरम्यान, बिबट्याने मुलावर हल्ला केल्याचं कळतच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ज्या दिशेने बिबट्या या मुलाला घेऊन गेला त्या दिशेने शोधा शोध सुरू केली. आणि काही वेळानंतर उसाच्या शेतात जखमी अवस्थेत रोहित आढळून आला. त्याला तातडीने नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या परिसरातील बिबट्याचा सरकारने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणीही केली जात आहे.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/838481359092135/}}}}

दरम्यान या घटनेमुळे काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अजून किती निष्पाप बळी जाणार?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Kills Boy Before Mother's Eyes; Villagers Demand Action

Web Summary : In Pune, a leopard fatally attacked an 8-year-old boy, Rohit Kapare, while he played near his parents. The mother witnessed the horrific event. This is the fourth such death in three months, sparking outrage and calls for government intervention to capture the leopard.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेleopardबिबट्या