शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Pune news : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:37 IST

- काही दिवसांत भूसंपादनाचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा

पुणे : बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या सक्तीच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांच्या कार्यालयाकडे आहे. येत्या काही दिवसांत भूसंपादनाला मान्यता मिळेल, असा विश्वास शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी व्यक्त केला आहे.कात्रज-कोंढव्यापासून मंतरवाडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंना लोकवस्ती वाढल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने कात्रज येथील राजस सोसायटी चौक ते कोंढवा खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन कि.मी. लांबीच्य रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु अगोदर निविदांमधील अडचणी आणि नंतर भूसंपादनातील अडचणींमुळे या रस्त्याचे काम अनेक वर्षे रेंगाळले आहे.सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळे रस्त्याचे भूसंपादन वेळेत व्हावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले जात आहेत. या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महापालिका यांनी याविषयी वारंवार बैठक झाल्यानंतर १५ मार्चपर्यंत कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्याने अद्याप भूसंपादनाचा प्रश्न सुटलेला नाही.याविषयी पावसकर म्हणाले, महसूलमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कात्रज-कोंढव्याच्या भूसंपादनाचा विषय निघाला होता. येत्या काही दिवसातच प्रस्तावाला मान्यता मिळेल, असे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे. सुमारे ३.५ ते ४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या विकासासाठी जवळपास २७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या हरकतींमुळे प्रक्रिया रखडली होती; मात्र आता आवश्यकतेनुसार सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Katraj-Kondhwa Road Land Acquisition File Awaits Revenue Minister's Approval

Web Summary : The Katraj-Kondhwa road widening project faces delays due to land acquisition hurdles. The file is now with the Revenue Minister, and approval is expected soon. This project aims to reduce traffic congestion and accidents on the busy stretch. Approximately 27 hectares of land is required for the 3.5-4 km road development.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा