शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त आयुक्तांची भेट घेत चंद्रकांत पाटलांनी वाचला पुण्यातील अडचणींचा पाढा

By किरण शिंदे | Updated: June 2, 2025 13:09 IST

पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

पुणे - पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन शहराच्या विविध समस्या व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीत प्रामुख्याने प्रभागरचना, निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांवर आधारित नियोजन, तसेच महापालिकेतील सध्याची स्थिती याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे स्थानिक प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या वेळेवर ऐकून घेणं आणि त्यावर त्वरित कारवाई करणं कठीण झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

रस्त्यांची दयनीय स्थिती आणि निधीचा अपव्यय

पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या कामांमध्ये राजकीय यंत्रणांच्या हस्तक्षेपामुळे अडथळे येत असल्याची तक्रार त्यांनी आयुक्तांसमोर मांडली.

पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. "एका पावसात नाले तुंबत असतील, तर नागरिकांच्या समस्या अधिकच वाढतील. त्यामुळे पावसाळ्याची वाट न बघता आधीच तयारी केली पाहिजे," असा सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला.

ट्रॅफिक, अतिक्रमण आणि अधिग्रहणावर भर

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हे देखील शहरवासीयांसाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. "या बाबतीत महापालिकेने दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण आखले पाहिजे. अधिग्रहणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि अतिक्रमणावर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे," असं पाटील यांनी नमूद केलं.

पुणे मेट्रो आणि स्वच्छता मोहिमेवर भर

पुणे मेट्रोच्या कामांबाबत सुद्धा अनेक बैठकांची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. "योजना संथगतीने सुरु आहेत, त्यामुळे त्याला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेने हे शक्य आहे," असे ते म्हणाले.

त्याचबरोबर ‘स्वच्छ कसबा’ मोहिमेचा उल्लेख करत, स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याने ‘इंदोर’च्या धर्तीवर पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. “स्वच्छता ही फक्त अभियान न राहता ती नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवी,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटील