शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:22 IST

फरार होण्याआधी कारवाई करा; चाकणकरांवर अंधारे यांचा गंभीर आरोप

पुणे : स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले. अंधारे यांनी दावा केला की, आरोपी अशोक खरात यांच्या ट्रस्टशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा संबंध असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आहेत.  माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी खालील मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली, रूपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी.  दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावी चौकशीपूर्वी चाकणकर यांना पदावरून बाजूला करावे.. त्या फरार होण्यापूर्वी कारवाई व्हावी त्या पुढे म्हणाल्या,  चाकणकर आणि खरात यांचे CDR (Call Detail Records) तपासावेत.  या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनेही तपास करावा दोघांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासावेत, विशेषतः खरात यांची देश-विदेशातील मालमत्तेची चौकशी व्हावी.   पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना अंधारे यांनी आरोपही केला की,रूपाली चाकणकर या त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून तपासावर परिणाम करू शकतात.  तसेच, त्या सध्या कुठे आहेत याबाबतही शंका उपस्थित करत त्यांनी त्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, याची चौकशी करण्याची मागणी केली. अंधारे यांनी स्पष्ट केले की,या प्रकरणात कुणीही दोषी असेल, तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई व्हावी. त्यांनी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची नावे घेतली, मात्र त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचेही सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Narco test Ruapli Chakankar; Sushma Andhare serious allegations on Ashok Kharat

Web Summary : Sushma Andhare demands Rupali Chakankar's narco test and arrest due to alleged ties with accused Ashok Kharat. She urges investigation into financial assets and potential influence on the case, regardless of party affiliation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshok Kharatअशोक खरातPuneपुणेSushma Andhareसुषमा अंधारेRupali Chakankarरुपाली चाकणकर