शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कागदावरच, पुण्यातील २५ पैकी १० प्रकल्प बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:30 AM

कच-यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प केवळ कागदावरच चालू असून, तब्बल १० प्रकल्प पूर्णपणे बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे  - शहरातील कचरा शहरामध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे सुमारे २५ प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी २.५० कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले जात आहेत. परंतु, कच-यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प केवळ कागदावरच चालू असून, तब्बल १० प्रकल्प पूर्णपणे बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अन्य प्रकल्प ५० टक्के क्षमतेनेदेखील चालू नाहीत. महापालिका प्रशासनाच्या प्रचंड दुर्लक्षामुळे नागरिकांच्या कराच्या पैशांची अशा उधळपट्टी सुरू आहे.शहराचा कचरा ग्रामीण हद्दीत येऊ देणार नाही, अशी भूमिका पुणे शहराच्या हद्दीलगतच्या भागातील नागरिकांनी घेतली होती. तसेच फुरसुंगी येथील कचरा डेपोवर देखील ओपन डपिंग करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे शहरात निर्माण होणाºया कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने तातडीने तब्बल १६ ते १८ कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात सरासरी ५ टन ओल्या कचºयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प सुरू केले. शहरामध्ये सध्या एकूण २५ कचºयापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत सजग नागरिक मंचाच्या वतीने माहिती अधिकारामध्ये माहिती मागविली असता यामध्ये अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात हडपसर, पेशवे पार्क, कात्रज रेल्वे म्युजियम येथील एकूण ५ प्रकल्प पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे केवळ करार नूतनीकरण न केल्याने आॅक्टोबर २०१५ पासून हे प्रकल्पबंद असल्याचे समोर आले. तर वडगाव, घोले रोड, वानवडी, पेशवे पार्क येथील ५ प्रकल्पांत गेल्या वर्षभरात एकही युनिट वीजनिर्मिती झालेली नाही.एक महिना : दीडशे टन कचरा जिरवावाप्रत्येक प्रकल्पामध्ये महिन्याला १५० टन कचरा जिरवणे अपेक्षित असताना, वडगाव १ मध्ये ४०%, वडगाव २ मध्ये ३०%, घोले रोडमध्ये ५५%, धानोरी मध्ये ३०%, पेशवे पार्क २ मध्ये ३५%, फुलेनगरमध्ये १०% एवढ्याच क्षमतेने कचरा जिरवला गेला.वीज निर्मितीसाठी सुरू केलेल्या कचरा प्रक्रियेमध्ये १० किलो ओल्या कचºयापासून १ घन मीटर गॅस तयार व्हावे. मात्र, कालावधीत या सर्व २० प्रकल्पात पाठवलेल्या कचºयापासून फक्त २० % क्षमतेने गॅस निर्मिती झाली.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये टक्का यामुळेच घसरलामहापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले. परंतु, प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. तर गेल्या काही वर्षांत यातील अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाला जाब विचारला आहे. परंतु अद्यापही यामध्ये काहीही दुरुस्ती झालेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. याचाच परिणाम केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराच्या स्वच्छतेचा टक्का घसरला.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचकच-यापासून वीजनिर्मिती होणाºया प्रकल्पांची सद्यस्थितीएकूण प्रकल्प 25पूर्णपणे बंद प्रकल्पहडपसर १, हडपसर २, पेशवे पार्क १ व २, कात्रज रेल्वे म्युझियम, वडगाव १,वडगाव २, घोलेरोड,वानवडी, पेशवे पार्क

टॅग्स :electricityवीजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका