शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

पुणे महापालिकेच्या ‘स्थायी’चे अंदाजपत्रक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:03 IST

वाहतूक, महसूलवाढीसह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार असल्याची ग्वाही

ठळक मुद्देपाणीपुरवठा, नदी सुधारणा, मैलापाणी शुद्धीकरण, वाहतूक, आरोग्य आदी योजनांसाठी पुरेशी तरतूद

पुणे : पुणेकरांच्या सोयीसुविधांचा सर्व अंगांनी विचार करून हे अंदाजपत्रक तयार केले आहे. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता, बँकेचा अध्यक्ष, स्थायीचा सदस्य आणि आता स्थायी समिती अध्यक्ष, हा प्रवास करताना आलेल्या अनुभवांमधून हे अंदाजपत्रक तयार केले आहे. निश्चितच ठरवून घेतलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून वाहतूक, महसूलवाढीसह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मुख्य सभेला दिला. पालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहामध्ये सोमवारपासून स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी त्यांची मते मांडली. बुधवारी पक्षनेत्यांच्या भाषणानंतर सभागृहनेते, उपमहापौर आणि स्थायी अध्यक्ष रासने यांची भाषणे झाली. त्यानंतर हे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. .........पाणीपुरवठा, नदी सुधारणा, मैलापाणी शुद्धीकरण, वाहतूक, आरोग्य आदी योजनांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. सर्वांचा विचार केलेला हा अर्थसंकल्प आहे. स्थायी समितीने सर्व घटकांना न्याय देण्याचा आणि शहराच्या विकासाचा विचार केल्याचे या अंदाजपत्रकामधून जाणवते. - उपमहापौर सरस्वती शेंडगे

फुगविलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी होणार? योजनांच्या घोषणा केल्या पण त्या पूर्ण कशा करणार? गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ५० टक्के निधीही खर्च झालेला नाही. उत्पन्नाबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज अवास्तवदर्शी आहेत. गुंठेवारी पद्धत आणल्यास उत्पन्नात वाढ होईल. समाविष्ट गावांचा विकास आराखडा होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज ही नुसतीच गोंडस नावे आहेत. वाहतूककोंडीवर ठोस उपाय व निधी नाही. विरोधी पक्षाच्या सदस्यांना निधी देताना दुजाभाव करण्यात आला आहे. - दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या............सर्वसामान्य पुणेकरांना डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले अंदाजपत्रक आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसे कसे येतील, योजनांचा भार पालिकेवर पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक, बस खरेदीबाबत तरतूद करून शहराच्या महत्त्वाच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून देण्यात आले आहे. आरोग्याच्यादृष्टीनेही महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी शस्त्रक्रिया रुग्णालय, नानाजी देशमुख सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी रुग्णालय आदी महत्त्वपूर्ण योजना आणण्यात आल्या आहेत. परवडणारी घरे, पाणी या विषयांना न्याय देण्यात आला आहे. - धीरज घाटे, सभागृहनेता.................एखादे मोठे काम सुरू असताना थोडा त्रास होणारच मेट्रो, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना आदी मोठी कामे केवळ कागदावरच नाहीत, तर या कामांची कार्यवाही चालू आहे़ एखादे मोठे काम सुरू असताना वेळ लागतो व त्याचा थोडा त्रास सहन करावा लागतो़ मात्र, याच विकासकामांमुळे पुणे शहराचा भविष्यातील चेहरामोहरा बदलणार असून, या कामांचे कौतुकच पुढे होणार आहे़, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना केले़ अर्थसंकल्पात शहरी गरीब योजना, पंतप्रधान आवास योजना, योगा केंद्र, ११ गावांच्या विकासकामांसाठीच्या भरीव तरतुदीबाबत त्यांनी रासने यांचे कौतुक केले़ - श्रीनाथ भिमाले............मिळकत कराकरिता एका महिन्यासाठी अभय योजना आणा महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी होर्डिंग पॉलिसी आणावी़ तसेच, थकीत मिळकत करवसुलीसाठी एक महिना का होईना अभय योजना आणावी़, असे मत स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर यांनी व्यक्त केले़ महापालिकेच्या शाळांमधील दीड लाख विद्यार्थिसंख्या आजमितीला ५० हजारांवर आली आहे़ शिक्षण विभागाची ही दुरवस्था टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची स्थापना करावी, असेही त्यांनी सांगितले़ - अजित दरेकर................... 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्पMayorमहापौर