शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 'एनएमसी'ची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 20:07 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आश्वासन 

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला

पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या नॅशनल मेडिकल कमिशनची (एनएमसी) मान्यता लवकरच मिळेल. ही मान्यता मिळण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वास केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शिष्टमंडळाला दिले. मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश देण्यास सुरुवात केली जाणार आहे. 

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा समावेश होता. 

महापौर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना मांडली होती. पालिकेने त्याकरिता निधी उपलब्ध दिला होता. पालिकेने महाविद्यालयाचा आराखडा तयार केला होता. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि मान्यता मिळाल्या आहेत. तसेच आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत.  राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. अंतिम मंजुरीसाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने मोहोळ, बीडकर, रासने यांनी हर्षवर्धन यांची भेट घेऊन  महाविद्यालयासंदर्भात चर्चा केली. तसेच मान्यतेसंदर्भात मदत करण्याची विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयाबाबत झालेल्या तांत्रिक पूर्ततांची माहिती आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुरेश चंद्र शर्मा यांचीही भेट घेण्यात आली. ====वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यातील शेवटचा टप्पा महत्वाचा आहे. विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. शहराची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी हे महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे.  सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आरोग्य मंत्र्यांकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौर

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका