शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:29 IST

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली.

पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती आल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २ हजार ८८३ हरकती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तर सर्वात कमी १४ हरकती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ आहे.

त्यात दुबार मतदारांची नावे तब्बल तीन लाख ४४६ आहेत. पालिकेच्या ४१ पैकी १० प्रभागांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. या प्रारूप मतदार यादीवर आता हरकती नोदविण्याच्या मुदतीमध्ये वाढ करून ३ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडणार आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सशुल्क विकत मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत प्रारूप मतदार यादीच्या विक्रीतून १५ लाख ४२ हजार २९७ रुपये मिळाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Election: 5,327 Objections Filed on Draft Voter List

Web Summary : Over 5,327 objections were filed within eight days regarding Pune Municipal Corporation's draft voter list. The deadline for objections is extended to December 3rd. The voter list contains 35,51,469 voters, including duplicate entries. Sale of voter lists generated ₹15.42 lakhs.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक